डोळ्यासमोर शेतकऱ्याच्या जमिनीचा लिलाव, सरकारी कर्जमाफीचे दावे फक्त भाषणात

कर्जबाजारी शेतकऱ्याची जमीन आधी जप्त करण्यात आली आणि त्यानंतर मंगळवारी तिचा लिलाव करण्यात आला.

Updated: Jan 19, 2022, 08:31 PM IST
डोळ्यासमोर शेतकऱ्याच्या जमिनीचा लिलाव, सरकारी कर्जमाफीचे दावे फक्त भाषणात title=

दौसा : शेतकरी कर्जमाफीपासून (Farmer loan waiver) ते शेतकऱ्यांच्या विकासासाठी प्रत्येक राजकारणी मंडळी आणि पॉलिटिकल पार्टी मोठ मोठी आश्वासने आणि भाषण देतात. ती आश्वासने पूर्ण करण्यासाठी ते प्रत्येक भाषणात शेतकऱ्यांच्या प्रश्नांचा उल्लेख करतात आणि आपल्याला आपल्या जबाबदारीचे जाणीव आहे असे देखील सगळ्यांना भासवतात. परंतु त्याची खरी गरज जेव्हा शेतकऱ्याला पडते, तेव्हा मात्र शेतकऱ्यासोबत कोणीही उभं राहायला तयार नाही. असाच एक प्रकार राजस्थानमध्ये घडला, येथे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या दाव्यांदरम्यान कर्जाची परतफेड करण्यात अयशस्वी झाल्यामुळे एका शेतकऱ्यांच्या जमिनीचा लिलाव करण्यात आला.

हे प्रकरण राजस्थानमधील दौसा जिल्ह्यातील रामगढ पचवाडा येथील आहे. तेथे कर्जबाजारी शेतकऱ्याची जमीन आधी जप्त करण्यात आली आणि त्यानंतर मंगळवारी तिचा लिलाव करण्यात आला. आपल्या जमीनीचा लिलाव पाहात बसण्याशिवाय शेतकरी काहीच करु शकत नव्हता.

शेतकरी आपल्या डोळ्यानं हे सगळं पाहात राहिला आणि हे सगळं पाहताना त्याला आश्रु अनावर झाले. जमिनीचा लिलाव झाल्यानंतर शेतकरी कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दौसा जिल्ह्यातील जामुन की धानी येथील रहिवासी कजोद मीना यांनी रामगढ पाचवाडा येथील राजस्थान मरुधारा ग्रामीण बँकेतून केसीसीचे कर्ज घेतले होते. सन 2017 नंतर शेतकरी 7 लाख रुपयांपेक्षा जास्त कर्जाची परतफेड करू शकला नाही.

त्यानंतर KCC कर्ज घेतलेल्या कजोद मीना या शेतकऱ्याचाही मृत्यू झाला. यानंतर बँकेने मयत शेतकऱ्याची मुले राजूलाल आणि पप्पूलाल यांना पैसे जमा करण्यासाठी अनेक नोटिसा दिल्या. परंतु शेतकरी कुटुंबाची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने ते KCC कर्ज जमा करू शकले नाहीत. त्याचबरोबर सरकारने दिलेल्या कर्जमाफीच्या आश्वासनाने ते आशावादी राहिले. परंतु त्याचा काहीही फायदा झाला नाही.

15 बिघा 2 बिसवा जमिनीचा 46 लाख 51 हजार रुपयांना लिलाव

सरतेशेवटी, रामगढ पाचवाडा एसडीएम कार्यालयाने जमीन जप्त करण्याचे आदेश जारी केले. मात्र शेतकरी कुटुंबाकडे जमा करण्यासाठी पैसे नव्हते. अशा स्थितीत जमीन संलग्न झाल्यानंतर मंगळवारी या शेतकऱ्याच्या जमिनीचा लिलाव करण्यात आला. शेतकरी कजोद मीना यांच्या सुमारे 15 बिघा 2 बिसवा जमिनीचा लिलाव 46 लाख 51 हजार रुपयात करण्यात आला. तहसील कार्यालयात शेतकऱ्यांच्या जमिनीची लिलाव प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.

कुटुंबाची काळजी कशी घ्यावी?

मंदावरी येथील रहिवासी असलेल्या किरण शर्मा यांना ही जमीन लिलावात सोडण्यात आली. जो शेतकरी आपली जमीन आपल्या आईपेक्षा मोठा मानतो, त्याच्या जमिनीचा लिलाव झाल्यावर त्याचे काय झाले असेल, याचा सहज अंदाज येतो. शेतकरी कुटुंबाची परिस्थिती हलाखीची होती. आता जायचे तर कुठे जायचे, असे शेतकरी कुटुंबातील सदस्यांनी सांगितले. कुटुंबाची काळजी कशी घ्यावी? अशा परिस्थितीत शेतकरी कुटुंबातील सदस्यांना आत्महत्या करण्यास भाग पाडले जात असल्याची चर्चा सुरू झाली.

बंदोबस्तासाठीही प्रयत्न सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले

दुसरीकडे, बँकेचे अधिकारी आणि रामगढ पाचवाडा एसडीएम म्हणतात की, शेतकऱ्याने केसीसी कर्ज जमा केले नव्हते. यासाठी वारंवार शेतकरी कुटुंबाशी संपर्कही करण्यात आला. तडजोडीसाठी प्रयत्नही झाले पण शेतकरी कर्ज फेडू शकला नाही. त्यानंतर मंगळवारी जमिनीचा लिलाव करण्यात आला.