शेतकरी संघटना आणि गृहमंत्री अमित शाह यांची संध्याकाळी बैठक

शेतकरी संघटना आणि देशाचे गृहमंत्री अमित शाह यांची संध्याकाळी चर्चा होणार आहे.

Updated: Dec 8, 2020, 03:37 PM IST
शेतकरी संघटना आणि गृहमंत्री अमित शाह यांची संध्याकाळी बैठक title=

नवी दिल्ली : शेतकरी संघटना आणि देशाचे गृहमंत्री अमित शाह यांची संध्याकाळी चर्चा होणार आहे. या संदर्भात भारतीय किसान युनियन चे प्रमुख राकेश टिकैत यांनी झी२४तास सोबत बोलताना माहिती दिली. त्यांनी म्हटलं की, अमित शाह यांच्या भेटीला संध्याकाळी जाणार आहोत. शेतकरी संघटना बैठकीला असतील. तत्पूर्वी सिंघू बोर्डरवर शेतकरी संघटनांची चर्चा होणार आहे.'

शेतकर्‍यांनी नवीन शेतीविषयक कायद्याच्या विरोधात पुकारलेल्या भारत बंदला संमिश्र प्रतिसाद दिसत आहे. शेतकर्‍यांच्या या आंदोलनाला 20 हून अधिक राजकीय पक्षांनी पाठिंबा दिला.

हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र तोमर यांची दिल्ली येथील निवासस्थानी भेट घेतली. अनेक दिवस आंदोलन सोडविण्याच्या प्रयत्नात ते होते. यावेळी दोन्ही नेत्यांनी पंजाब आणि हरियाणाच्या आंदोलक शेतकर्‍यांचे प्रश्न सोडविण्यासाठी चर्चा केली. 9 डिसेंबर रोजी होणार्‍या सहाव्या फेरीच्या चर्चेआधी हरियाणाचे मुख्यमंत्री आणि केंद्रीय कृषिमंत्री तोमर यांच्यात होणारी बैठक फार महत्वाची मानली जातेय.

यूपी गेटवरील किसान आंदोलनात सहभागी असलेल्या भीम आर्मीच्या कर्मचाऱ्यांवर पोलिसांनी लाठीमार केला. अनेक कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले.

केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी भारत बंदवरून विरोधी पक्षांवर निशाणा साधला आहे. स्मृती इराणी म्हणाल्या की, 'मतांच्या माध्यमातून जनतेचा पाठिंबा मिळू न शकलेले विरोधक आज कायदा व सुव्यवस्थेचा भंग करण्यावर उतरले आहे. जेणेकरुन त्याचे राजकारण चमकू शकेल. कुठेतरी राजकीय हस्तक्षेप आहे. जो अराजक पसरवतो.'