विधवा सुनेवर जडला सासऱ्याचा जीव, थेट कुंकूच भरलं! नकार देताच जे केलं, ऐकून थरकाप उडेल

 विधवा सुनेसह सासऱ्याचे घृणास्पद कृत्य केले, विरोध केला म्हणून तिचे मुंड करुन तिला गावभर फिरवले देखील. 

Updated: Oct 27, 2023, 06:40 PM IST
विधवा सुनेवर जडला सासऱ्याचा जीव, थेट कुंकूच भरलं! नकार देताच जे केलं, ऐकून थरकाप उडेल title=

Crime News : सासरा हा पित्यासमान असतो. सासरा आणि सुनेच्या नात्याला काळिमा फासणारी घटना बिहारमध्ये घडली आहे. मुलाच्या मृत्यूनंतर सुनेला आधार देण्याऐवजी सासऱ्याने तिच्यासह वाईट कृत्य केले. सासऱ्याने सुनेशी जबरदस्ती लग्न करण्याचा प्रयत्न केला. मात्र, सुनेने नकार देताच सासऱ्याने तिच्यासह जे काही केले ते ऐकून थरकाप उडेल. बिहारमधील मुझफ्फरपूरमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला आहे. 

मुझफ्फरपूरमधील कार्जा पोलिस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार घडला आहे. पीडीत महिलेने सासऱ्याविरोधात पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. 

नेमकं काय आहे प्रकरण?

पतीच्या मृत्यूनंतर पीडित महिला ही एकटीच घरी राहत होती. चुलत सासऱ्याची तिच्यावर वाईट नजर होती. 20 ऑक्टोबर रोजी हा प्रकार घडला आहे. सासरा जबरदस्ती तिच्या घरी घुसला. तिच्याशी असभ्य भाषेत बोलू लागला. यानंतर तिच्या कपाळाला कुंकू लावत त्याने तिच्याशी जबरदस्ती विवाह करण्याचा प्रयत्न केला. 

विधवा सुनेचे  मुंडन करुन गावभर फिरवले

जबरस्ती बेकायदेशीरपणे विवाह करण्याचा प्रयत्न करणाऱया सासऱ्याला सुनेने विरोध केला. नराधम सासऱ्याने आपल्या साथीदारांच्या मदतीने सुनेचे जबरदस्ती मुंडन केले आणि गावभर तिची धिंड काढली. यावेळी सुनेला वाचवण्यासाठी मदतीला आलेल्या सासुला देखील या नराधमाने मारहाण केली. 

सासऱ्यासह 8 जणांविरोधात गुन्हा दाखल

पीडित महिलेच्या तक्रारानंतर पोलिसांनी सासऱ्यासह 8 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. देवेंद्र मांझी, गुला मांझी, जय राम मांझी, शंभू मांझी, सोनू मांझी, जयलाल मांझी, अखिलेश मांझी आणि मिथलेश मांझी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. हे सर्व पीडित महिलेचे नातेवाईक आहेत. या सर्वांनी आरोपीला महिलेविरोधात वाईट कृत्य करण्यास मदत केली.

आरोपी फरार

पीडित महिलेने  8 जणांविरोधात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसात गुन्हा दाखल झाल्यानंतर सर्व आरोपी फरार झाले आहेत. पोलिस आरोपींचा शोध घेत आहेत.