FD Rules Changed | RBI ने बदलले FD चे जुने नियम! जाणून घ्या नाहीतर होईल नुकसान

FD Rules Changed: तुम्हीही FD करण्याचा विचार करत असाल तर बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. RBI ने FD चे नियम बदलले आहेत. 

Updated: Apr 19, 2022, 09:25 AM IST
FD Rules Changed | RBI ने बदलले FD चे जुने नियम! जाणून घ्या नाहीतर होईल नुकसान  title=

मुंबई :  FD Rules Changed: RBI ने FD शी संबंधित नियमांमध्ये बदल केले आहेत. यानंतर अनेक सरकारी आणि गैर-सरकारी बँकांनीही FDवरील व्याजदरात वाढ केली आहे. त्यामुळे तुम्हीही एफडी करण्याच्या विचारात असाल तर हे नियम तुम्हाला माहित असायला हवे.

FD चे मॅच्युरिटीचे नियम बदलले

 आरबीआयने मुदत ठेव (FD) च्या नियमांमध्ये एक मोठा बदल केला आहे. आता मॅच्युरिटी पूर्ण झाल्यानंतर, जर तुम्ही रकमेवर दावा केला नाही तर तुम्हाला त्यावर व्याज कमी मिळेल. हे व्याज बचत खात्यावर मिळणाऱ्या व्याजाइतके असेल. सध्या, बँका सामान्यतः 5 ते 10 वर्षांच्या दीर्घ कालावधीच्या FD वर 5% पेक्षा जास्त व्याज देतात. तर बचत खात्यावरील व्याजदर सुमारे 3 ते 4 टक्के आहेत.

RBIने जारी केला आदेश 

आरबीआयने दिलेल्या माहितीनुसार, जर मुदत ठेवच्या रक्कमेवर maturity period नंतरही दावा केला गेला नाही. तर बचत खात्यानुसार व्याज दर किंवा एफडीवर निश्चित केलेला व्याज दर, यापैकी जे कमी असेल ते दिले जाईल. सर्व व्यावसायिक बँका, लघु वित्त बँका, सहकारी बँका, स्थानिक प्रादेशिक बँकांमधील ठेवींवर हे नवीन नियम लागू झाले आहेत.

उदाहरणाने समजू घ्या

समजा तुमच्याकडे 5 वर्षांची मॅच्युरिटी असलेली एफडी आहे, जी आज मॅच्युर झाली आहे. परंतू तुम्ही अद्यापही पैसे काढण्यासाठी दावा केलेला नाही. तर यावर दोन गोष्टी होतील. जर FD वर मिळणारे व्याज त्या बँकेच्या बचत खात्यावरील व्याजापेक्षा कमी असेल तर तुम्हाला FD वर व्याज मिळत राहील.

जर एफडीवर मिळणारे व्याज बचत खात्यावर मिळणाऱ्या व्याजापेक्षा जास्त असेल, तर तुम्हाला मुदतपूर्तीनंतर बचत खात्याप्रमाणे व्याज मिळेल.