मुंबई : FD Rules:तुम्हीही मुदत ठेवी (FD) मध्ये गुंतवणूक करत असाल तर ही बातमी तुमच्या कामाची आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने FD शी संबंधित नियम बदलले असून ते लागू देखील करण्यात आले आहेत. गेल्या काही दिवसांपासून सरकारी आणि गैर-सरकारी बँकांनी एफडीवरील व्याजदरात वाढ केली आहे. म्हणूनच FD करण्यापूर्वी तुम्हाला बदललेले नियम माहित असणे महत्वाचे आहे. जर तुम्हाला हे माहित नसेल तर तुमचे नुकसान होऊ शकते.
आरबीआयने मुदत ठेव (FD) च्या नियमांमध्ये हा बदल केला आहे की, जर तुम्ही मुदतीनंतर म्हणजेच मॅच्युरिटीनंतर तुमच्या रकमेवर दावा केला नाही तर तुम्हाला त्यावर कमी व्याज मिळेल. हे व्याज एफडीइतके नसून बचत खात्यावर मिळणाऱ्या व्याजाइतके असेल. सध्या 5 ते 10 वर्षांच्या एफडीवर बँकांकडून 5 टक्क्यांहून अधिक व्याज दिले जाते. त्याच वेळी, बचत खात्यावरील व्याजदर 3 ते 4 टक्क्यांपर्यंत आहेत.
आरबीआयने शेवटच्या दिवसात दिलेल्या माहितीनुसार, जर एफडी मॅच्युअर झाली परंतू तुम्ही त्यानंतरही रक्कमेवर दावा केला नाही. तर त्यावरील व्याजदर बचत खात्यांच्या आधारे दिला जाईल. सर्व व्यापारी बँका, लघु वित्त बँका, सहकारी बँका, स्थानिक प्रादेशिक बँकांमधील ठेवींना हा नियम लागू असेल.
उदाहरणार्थ, तुम्ही 5 वर्षांच्या मॅच्युरिटीची FD केली आहे. पाच वर्षानंतरही तुम्ही संबधीत एफडीच्या रक्कमेवर दावा केला नाही तर, त्यानंतरचे व्याज बचत खात्याइतके असेल.
याआधी, तुमच्या FD च्या मॅच्युरिटीनंतर, तुम्ही पैसे काढले नाहीत किंवा त्यावर दावा केला नाही, तर बँक तुमची FD त्याच कालावधीसाठी वाढवत असे ज्यासाठी तुम्ही आधी मुदत ठेव ठेवली होती. पण आता जर तुम्ही मॅच्युरिटीवर पैसे काढले नाहीत तर तुम्हाला त्यावर FD व्याज मिळणार नाही.