दिल्लीत महाराष्ट्र सदनमधील राज्यपालांच्या खोलीला आग

दिल्लीतील महाराष्ट्र सदनमधील आगीचं कारण अद्याप अस्पष्ट 

Updated: Jul 26, 2021, 10:09 AM IST
दिल्लीत महाराष्ट्र सदनमधील राज्यपालांच्या खोलीला आग

नवी दिल्ली : नवीन महाराष्ट्र सदनमधील राज्यपालांच्या खोलीला आग लागली आहे. आग लागल्याने महाराष्ट्र सदनात धूरच धूर पसरला आहे. आसपासच्या खोलीत राहणा-यांना बाहेर काढण्यात आलं आहे. आग कशामुळे लागली याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. आता महाराष्ट्र सदन प्रशासन आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करत आहे. 

राज्यपालांच्या खोलीच्या आसपासच्या खोल्या रिकाम्या करण्यात आल्या आहेत. फर्निचरचं मोठं नुकसान झालं आहे. राज्यपालांच्या खोलीतील सर्व सामान बाहेर काढण्यात आलं आहे. आज विझवण्यासाठी अग्निशमन दलाचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत.