VIDEO: सिनेमातील दृश्याप्रमाणे त्यांनी केला गोळीबार आणि कैदी झाला पसार

एखाद्या सिनेमात शस्त्रधारी हल्ला करतात आणि पोलिसांच्या तावडीतून गुन्हेगाराला पळवून नेतात तसाच प्रकार हरियाणात घडला आहे.

Sunil Desale Sunil Desale | Updated: Sep 9, 2017, 04:52 PM IST
VIDEO: सिनेमातील दृश्याप्रमाणे त्यांनी केला गोळीबार आणि कैदी झाला पसार title=
Image: Screen Grab

नवी दिल्ली : एखाद्या सिनेमात शस्त्रधारी हल्ला करतात आणि पोलिसांच्या तावडीतून गुन्हेगाराला पळवून नेतात तसाच प्रकार हरियाणात घडला आहे.

हरियाणातील महेंद्रगढ परिसरात पोलीस अधिकारी गुन्हेगारांना घेवून न्यायालय परिसरात पोहोचतात. मात्र, त्याच दरम्यान काही शस्त्रधारी पोलिसांवर हल्ला करतात आणि गुन्हेगाराला पळवून घेऊन जातात. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

शस्त्रधारी हल्लेखोरांनी १२ कैद्यांपैकी एका कैद्याला पळवून घेऊन जातात. या कैद्यावर ५ लाख रुपयांचं बक्षीस ठेवण्यात आलं होतं. दरम्यान, हल्लेखोरांनी केलेल्या या हल्ल्यात ४ पोलीस जखमी झाले आहेत.

शुक्रवारी सकाळी ९.४० मिनिटांनी नरनौल जेलमधून १२ कैद्यांना न्यायालयात नेण्यात आलं. सकाळी सव्वा दहा वाजण्याच्या सुमारास पोलिसांची गाडी न्यायालयाच्या परिसरात उभी असताना हल्लेखोरांनी अचानक हल्ला केला. हल्ला केल्यानंतर संधी पाहून त्यांनी हत्या आणि चोरीतील आरोपी विक्रम उर्फ पप्पला याला पळवून नेण्यात यशस्वी झाले.

हल्लेखोरांनी केलेल्या गोळीबारात एक कैदी आणि चार पोलीस जखमी झाले आहेत. गोळीबारात जखमी झालेल्या नितेश नांगल हरनाथ या कैद्याची प्रकृती चिंताजनक आहे.