पाच खासदारांचे तिकीट कापले जाणार?

लोकसभा निवडणुकीत बिहारमध्ये गिरीराज सिंगसमवेत पाच खासदारांचं तिकीट कापले जाण्याची शक्यता आहे. 

Updated: Mar 12, 2019, 11:49 PM IST
पाच खासदारांचे तिकीट कापले जाणार?

पाटणा : लोकसभा निवडणुकीत बिहारमध्ये गिरीराज सिंगसमवेत पाच खासदारांचं तिकीट कापले जाण्याची शक्यता आहे. बिहारमध्ये एनडीए आणि महाआघाडीमध्ये तिकीट वाटपावरुन वातावरण चांगलंच तापले आहे. काही नेत्यांनी दिल्लीला धाव घेतली आहे. नवादा जागेसाठी लोक जनशक्ति पक्षाकडे जाण्याची शक्यता आहे. यामुळे गिरीराज सिंह यांचं तिकीट कापलं जाण्याची शक्यता आहे.

दरम्यान गिरीराज सिंह यांना बेगूसरायमधून तिकीट देण्याचीही चर्चा सुरू आहे. पक्ष स्थानिक नागरिकांची मत आणि मित्रपक्षांची पकड असलेल्या मतदार संघाचाही आढावा घेत असल्याने काही खासदारांचे तिकीट कापलं जाण्याची चर्चा आहे. बिहारमध्ये मित्रपक्षासाठी भाजप जागा सोडत आहे. महाराष्ट्रातही सोडण्याची शक्यता आहे. त्यामुळे देशभरात भाजपा बेरीजेचं राजकारण करत असल्याचं चित्र असताना विरोधी आघाडीमध्ये मात्र केवळ वजाबाकी दिसत आहे.