भारत-पाक सीमेजवळ पाकिस्तानी लष्कराच्या हालचाली वाढल्या

जैसलमेर लगत असलेल्या भारत-पाकिस्तान सीमेजवळ पाकिस्तानी लष्कराच्या हालचाली वाढल्या आहेत.  

Updated: Mar 12, 2019, 11:12 PM IST
भारत-पाक सीमेजवळ पाकिस्तानी लष्कराच्या हालचाली वाढल्या title=
संग्रहित छाया

नवी दिल्ली : जैसलमेर लगत असलेल्या भारत-पाकिस्तान सीमेजवळ पाकिस्तानी लष्कराच्या हालचाली वाढल्या आहेत. १५ फेब्रुवारीपासून पाकिस्तानी लष्कराची जमवाजमव सुरु असल्याचे दिसून आले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार कराचीची चौथी कोअर, लाहौरची पाचवी कोअर तर रावळपिंडीची दहावी कोअर तैनात आहे. भारतीय हद्दीतल्या लोंगोवाल पोस्टसमोर घोटकी भागात ६१ व्या डिव्हीजनने छावणी केली. पाकिस्तानी लष्काराच्या या हालचालींमुळे सीमेवर भारताने हाय अलर्ट जारी केला आहे. 

पुलवामा हल्ल्यानंतर पाकिस्तानातही हालचाली वाढल्या आहेत. पाकिस्तानकडून नियंत्रणरेषेकडून गोळीबार करण्यात येत आहे. जम्म-काश्मीरमधील पुलवामा येथे पाकिस्तानातील जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने केलेल्या भ्याड हल्ल्यात भारताचे चाळीस जवान शहीद झाले. या सर्व पार्श्वभूमीवर भारत आणि पाकिस्तानमधील संबंध तणावाचे झाले आहेत. भारताकडून चहूबाजूंनी पाकिस्तानची कोंडी सुरु झाली. भारताकडून भविष्यात हल्ला होऊ शकतो, अशी भीती पाकिस्तानला असल्याने  पाकिस्तानने युद्धाबाबत तयारी सुरु केली आहे. 

तसेच पाकिस्तानकडून हेरगिरीसाठी ड्रोन पाठविण्यात येत आहेत. आतापर्यंत भारताने पाकिस्तानचे तीन ड्रोन पाडले आहेत. पाकिस्तानकडून सातत्याने कुरापती काडण्यात येत आहेत.