Flight Fuel : विमानात वापरलं जाणाऱ्या इंधनाची किंमत काय, ते किती माईलेज देतं? पाहा Interesting माहिती

Flight Fuel : कार आणि बाईकनं प्रवास करणाऱ्या अनेकांपुढं सध्या असणारा प्रश्न म्हणजे या पेट्रोल आणि डिझेलचे दर आणखी किती वाढणार? सध्या इंधन दरवाढीला ब्रेकच लागत नसल्यामुळं हा प्रश्न उपस्थित होत आहे. पण, तुम्ही कधी विमानातील इंधनाचा विचार केला आहे का? 

Updated: Mar 29, 2023, 12:47 PM IST
Flight Fuel : विमानात वापरलं जाणाऱ्या इंधनाची किंमत काय, ते किती माईलेज देतं? पाहा Interesting माहिती  title=
Flight Fuel petrol price mileage and name details in marathi

Flight Fuel Price : एखादी (Bike) दुचाकी किंवा चार चाकी (Car) अर्थात कार किंवा बाईक जेव्हा आपण खरेदी करतो तेव्हा ते वाहन आपल्याला किती माईलेज देईल हा पहिला प्रश्न आपण विचारतो. म्हणजेच अमुक लीटर इंधनात वाहन किती किलोमीटरचं अंतर कापेल याचंच ते गणित असतं. इंधनाची किंमत, भविष्यात होणारी दरवाढ या सर्वच गोष्टी विचारात घेतल्या जातात. काही मंडळी तर, इंधन दरवाढीचं प्रमाण पाहून आहेत ती वाहनंही विकण्याचा निर्णय घेताना दिसतात. हे झालं सर्वसामान्य वाहनांच्या इंधनाचं. पण, तुम्ही कधी विमानात वापरल्या जाणाऱ्या इंधनाचा विचार केला आहे का? 

विमानात कोणतं इंधन वापरलं जातं? (Fuel Rates)

विमान (Aeroplane) किंवा हेलिकॉप्टरसाठी (helicopter) सहसा जेट फ्यूल वापरलं जातं. या इंधनाला एविएशन केरोसिन असंही म्हणतात. या क्षेत्रात हे इंधन QAV नावानं ओळखलं जातं. जेट फ्यूलही ज्वलनशील असतं. पेट्रोलियम इंधनांपासून निघणारं हे डिस्टिस्ड लिक्विड असतं. केरोसिनपासून तयार करण्यात आलेलं हे इंधन कमर्शिअल एअर ट्रान्सपोर्टसाठी मोठ्या प्रमाणावर वापरात आणलं जातं. 

आता राहिला प्रश्न या इंधनाच्या दरांचा, तर (Indian Oil) इंडियन ऑईलच्या संकेतस्थळावर दिलेल्या माहितीनुसार एटीएफचे दर Domestic आणि International प्रवासासाठी वेगवेगळे आहेत. दिल्लीमध्ये सध्या या इंधनाचे जर 1,07,750 रुपये प्रति किलोलीटर इतके आहेत. म्हणजेच हे इंधन 107 रुपये लीटर दरानं विकलं जातं. एक किलोलीटर म्हणजे 1000 लीटर असं हे परिमाण होतं. मुंबईत या इंधनाचे दर 1,06,695 रुपये प्रती किलोलीटर इतके आहेत. लीटरच्या प्रमाणात एविएशन केरोसिनचे दर पाहिले तर, सर्वसामान्य वाहनांतील इंधन आणि जेट फ्लूलच्या दरात फारसा फरक नाही. 

एका इंधन भरल्यास किती दूर जाऊ शकतं विमान? 

दुचाकीच्या माईलेजची आकडेवारी मिळवण्याच्या पद्धतीनंच विमानाचं माईलेजही मोजलं जातं. विमान ताशी 900 किमी म्हणजेच 250 मीटर प्रती सेकंद इतक्या वेगानं गतीमान होतं. यादरम्यान विमानातील साधारण 2400 लीटर इतकं इंधन वापरलं जातं. किलोमीटरचं गणित पाहावं, तर दर किलोमीटरमागे विमानातील 2.6 लीटर इतकं इंधन वापरात आणलं जातं. दर, 384 मीटरमागे एक लीटर इंधन वापरात येतं. आहे की नाही कमाल? 

हेसुद्धा वाचा : Mukesh Ambani: आशिया खंडातील सर्वात श्रीमंत व्यक्तीचा मान मुकेश अंबानींकडून कोण हिरावणार? 'त्या' व्यक्तीचं नाव समोर

 

आपण विमानानं प्रवास करतो त्यावेळी असंख्य प्रश्न मनात घर करून असतात. अगदी हे विमान रस्ता कसं ठरवतं इथपासून त्याच्या खिडक्या का बंद असे प्रश्नही विचारले जातात. यातच इंधनाविषयीचा प्रश्न विचारणारेही कमी नाहीत. अशा या प्रश्नाचं उत्तर आता तुम्हालाही मिळालंय, ते इतरांनाही नक्की सांगा.