Nirmala Sitharaman Core Team: 'या' 5 जणांनी Budget 2023 बनवण्यासाठी अर्थमंत्र्यांना केली मदत

Budget 2023: भारताचं आर्थिक वर्ष 2023-24 चं बजेट 1 फेब्रुवारी रोजी सादर केलं जाणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण हे बजेट सादर करणार आहेत. देशाचं बजेट तयार करण्यासाठी अर्थमंत्र्यांना अनेक तज्ज्ञ मदत करतात. याच लोकांच्या खांद्यांवर बजेटमधील वेगवेगळ्या गोष्टींच्या जबाबदाऱ्या सोपवलेल्या असतात.

Updated: Jan 31, 2023, 10:31 PM IST
Nirmala Sitharaman Core Team: 'या' 5 जणांनी Budget 2023 बनवण्यासाठी अर्थमंत्र्यांना केली मदत
nirmala sitharaman budget 2023

Budget 2023 FM Nirmala Sitharaman Core Team: अर्थसंकल्प (Budget) फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या दिवशी सादर केला जात असला तरी तो तयार करण्याचं काम अनेक महिन्यांआधीच सुरु होतं. अर्थसंकल्प 2023 तयार करणाऱ्या निर्मला सीतरमण (FM Nirmala Sitharaman) यांच्या कोअर टीममध्ये निर्मला सीतारमण यांच्यासहीत एकूण सहा जणांचा समावेश आहे. सरकार पुढील वर्षभरामध्ये पैसे कोणत्या माध्यमातून कमवणार यासंदर्भातील अंदाज बांधून त्याप्रमाणे नियोजन करण्याची जबाबदारी या सहा लोकांवर असते. मागील वर्षभरामध्ये पूर्ण न झालेल्या किंवा चांगली कामगिरी केलेल्या क्षेत्रांमधील पैशांचं नियोजन कसं करायचं हे सुद्धा ही कोअर टीमच ठरवते. अर्थमंत्री वगळता या कोअर टीममध्ये कोणत्या पाच व्यक्तींचा समावेश आहे जाणून घेऊयात...

टी. व्ही. सोमनाथन (TV Somanathan) :

सर्वात प्रभावशाली सरकारी सचिवांपैकी एक असलेले टीव्ही सोमनाथक हे सध्या फायनॅन्स सेक्रेट्री (Finance Secretary TV Somanathan) म्हणून काम पाहतात. अर्थशास्त्रामध्ये पीएचडी मिळवलेले सोमनाथन हे तामिळनाडू कॅडरचे अधिकारी आहेत. पूर्वी सोमनाथन यांची पंतप्रधान कार्यालयामध्ये होती. अर्थ मंत्रालयाच्या व्यय म्हणजेच खर्चासंदर्भातील विभागाची जबाबदारी सोमनाथन यांच्याकडे आहे. पंतप्रदान नरेंद्र मोदींच्या (Prime Minister Narendra Modi) सर्वात विश्वासू अधिकाऱ्यांमध्ये सोमनाथन यांचा समावेश आहे.

अजय सेठ (Ajay Seth) :

कर्नाटक कॅडरमधील 1987 च्या बॅचचे आयएएस अधिकारी असलेले अजय सेठ हे 2021 पासून अर्थमंत्रालयामध्ये कार्यरत आहेत. ते आर्थिक विषयाचे सेक्रेट्री (Economic Affairs Secretary) म्हणून काम पाहतात. अर्थसंकल्पीय भाषणाला अंतिम स्वरुप देण्याची जबाबदारी अजय यांच्या खांद्यावर आहे. आर्थिक विषयासंदर्भातील विभागाचे सेक्रेट्री असल्याने अर्थसंक्लपासंदर्भातील सर्व सल्ले आणि शिफारशींचे विश्लेषण करण्याचं कामही अजयच करतात.

तुहिन कांत पांडे (Tuhin Kanta Pandey) :

डीआयपीएएम सचिव तुहिन कांत पांडे यांनी एअर इंडियाचं प्रायव्हेटायझेशन आणि भारतीय जीवन विमा निगम म्हणजेच एलआयसीचा आयपीओ आणण्याच्या कामामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे. 2023 च्या अर्थसंकल्पामध्ये भारत सरकारच्या निर्गुंतवणुकीकरणासंदर्भातील आर्थिक नियोजन करण्याची जबाबदारी डिपार्टमेंट ऑफ इनव्सेटमेंट अॅण्ड पब्लिक अॅसेट मॅनेजमेंटचे सेक्रेट्री तुहिन कांत पांडे यांच्या खांद्यांवर आहे. ते 1987 च्या ओडिसा कॅडरचे आयएएस अधिकारी आहेत.

विवेक जोशी (Vivek Joshi) :

हरियाणा कॅडरचे 1989 च्या बॅचचे अधिकारी असलेले जोशी हे जिनेव्हा विश्वविद्यालयामधून अंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र या विषयामध्ये डॉक्टरेट मिळवली आहे. अर्थ मंत्रालयातील अर्थ विषय सेवांचे सेक्रेट्री असलेले जोशी यापूर्वी गृहमंत्रालयाचे रजिस्ट्रार जनरल अॅण्ड सेन्सेसचे कमिश्नर होते. दोन सरकारी बँका आणि विमा कंपन्यांच्या खासगीकरणासंदर्भातील व्यवहारांवर जोशीच देखरेख ठेवत होते.

वी अनंत नागेश्वरन (V Ananth Nageswaran) :

2023 चं बजेट तयार करण्याबरोबरच 2022-23 चा आर्थिक सर्व्हे तयार करण्याची जबाबदारी संभाळणारे मुख्य आर्थिक सल्लागार (Chief Economic Advisor) नागेश्वरन हे अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचे सर्वात विश्वासू सल्लागार आहेत. आयआयएम अहमदाबादमधून एमबीए आणि मॅसॅच्युसेट्स एमरेस्ट यूनिव्हर्सिटीमधील फायनान्समध्ये पीएचडी करणारे नागेश्वरन 2019-21 मध्ये प्रधानमंत्र्यांच्या आर्थिक सल्लागार परिषदेचे पार्ट-टाइम मेंबरही होते.