गरिबी हटविण्यासाठी भारताने प्रयत्न करावे: पनगडीया

भारताने देशातील असमानता दूर करण्याआधी गरीबी हटविण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे मत निती आयोगाचे माजी उपाध्यक्ष अरविंद पनगडीया यांनी व्यक्त केले आहे.

Annaso Chavare अण्णासाहेब चवरे | Updated: Aug 28, 2017, 07:01 PM IST
गरिबी हटविण्यासाठी भारताने प्रयत्न करावे: पनगडीया title=

नवी दिल्ली : भारताने देशातील असमानता दूर करण्याआधी गरीबी हटविण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे मत निती आयोगाचे माजी उपाध्यक्ष अरविंद पनगडीया यांनी व्यक्त केले आहे.

पनगडीया यांनी म्हटले आहे की, भारताने समानता, नागरिकांचे आरोग्य आणि शिक्षण या मुलभूत गोष्टींसोबतच गरीबी हटविण्याकडेही प्रामुख्याने लक्ष द्यावे. एका कार्यक्रमात राजधानी दिल्लीत पनगडीया बोलत होते. यावेळी बोलताना पनगडीया म्हणाले, भारतात येत्या काळात गरीबी आणि असमानता यांचे उच्चाटन करण्यासाठी मोठा संघर्ष होऊ शकतो. आज आम्ही आमच्या आर्थीक धोरणांवर अभिमानाने बोलतो. पण, १९६० ते १९७०च्या दशकात आम्ही असमानतेबाबत फार चिंतीत होतो. आणि या चिंतेतूनच आखलेल्या धोरणात मोठ्या चुका झाल्या.

पुढे बोलताना पनगडीया म्हणाले, असमानता ही मोठी जटील आणि सर्वव्यापी गोष्ट आहे. भारत आणि विकसनशील देशांनी गरीबी हटविण्यासाठी महत्त्वाचे पाऊल टाकले पाहिजे. गरीबी हटल्यास असमानता कमी होण्यास महत्त्वाची मदत होईल. या वेळी पनगडीया यांनी बिहारचे कौतूक केले. ते म्हणाले इतर राज्यांच्या तुलनेत बिहारमध्ये अधिक समानता आहे.