भुवनेश्वर : सॅनिटरी पॅड्स हा आपल्या समाजात चर्चेसाठी टाळला जाणारा विषय. याविषयावर जागरुकता होणं गरजेच आहे. दरम्यान
ओडिसा सरकारने 'खुशी योजने'अंतर्गत अत्यंत कौतुकास्पद असे पाऊल उचलले आहे.
पूर्ण राज्यात १७ लाख शालेय विद्यार्थीनींना मोफत सॅनिटरी पॅड्स देण्याच्या योजनेचा शुभारंभ केलाय.
सरकारी आणि सरकार सहाय्यता शाळांमध्ये सहावी ते बारावी पर्यंतच्या मुलींना निशुल्क सॅनिटरी पॅड्स देण्यात येणार आहेत. मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी नुकताच योजनेचा शुभारंभ केला.
सबसिडी दरात महिला आणि मुलींना सॅनिटरी पॅड्सदेत योजनेचा विस्तार करु असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
मुलींचे शाळेत जाण्याचे प्रमाण वाढेल आणि महिला सशक्ती करणास मदत होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
याआधी राज्य सरकार महिलांसाठी मिशन शक्ति आणि ममता सारख्या विविध योजना आणण्याच्या तयारीत आहे.
ग्रामीण भागातील महिलांना किमान किंमतीत सॅनिटरी पॅड्स उपलब्ध करणार असल्याचे राज्य आरोग्यमंत्री प्रताप जेना यांनी सांगितले.