आता 18 वर्षावरील वयोगटातील लोकांना देखील मिळणार कोरोना लस

ऑनलाईन बैठक घेतल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

Updated: Apr 19, 2021, 08:07 PM IST
आता 18  वर्षावरील वयोगटातील लोकांना देखील मिळणार कोरोना लस

मुंबई : देशात काही दिवसापासून कोरोनाने हाहाकार मांडला आहे. कोरोनाची ही दुसरी लाट पहिल्या लाटे पेक्षा अधिक भयानक आणि वेगाने पसरणारी आहे. त्यामुळे या रुग्णवाढीला रोखण्यासाठी भारत सरकारने 18 वर्षांवरील सर्व लोकांना १ मे पासून कोरोना लस देण्यास सुरु करण्यासाठी मान्यता दिली आहे. आज म्हणजेच सोमवारी संध्याकाळी आरोग्य अधिकाऱ्यांसमवेत ऑनलाईन बैठक घेतल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

पीएम मोदी म्हणाले, "गेल्या एक वर्षापासून सरकार जास्तीत जास्त लोकांना लसी देण्यासाठी प्रयत्न करत आहे. म्हणूनच, आम्ही आता लसीकरण प्रक्रियेस गती देण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोना लसीकरणाचा तिसरा टप्पा 1 मेपासून सुरू होईल आणि या दिवसापासून 18 वर्षावरील वयोगटातील लोकांना देखील कोरोना लस मिळू शकेल.