Video:नवरदेवाची अस्सल देशी वरात पाहून हसू नका

 म्हशीच्या पाठीवरून जर कोणी वरात काढली तर काय होईल? हे जाणून घेण्यासाटी तुम्ही हा व्हिडिओ पाहाच.

Annaso Chavare अण्णासाहेब चवरे | Updated: Feb 18, 2018, 03:25 PM IST
Video:नवरदेवाची अस्सल देशी वरात पाहून हसू नका title=

मुंबई : सोशल मीडियाच्या जमान्यात काय काय व्हायरल होईल याचा काहीच नेम नाही. सोशल मीडियावरचा व्हायरल तडका इतका जबरदस्त की, भल्याभल्यांना गोत्यात आणतो आणि कुणीच नसणारांना लक्षवेधी बनवतो. याची अनेक उदाहरणे आपल्या आजुबाजूला दिसतात. पण, यातील काही घटना मात्र फारच मजेशीर असतात. उदा. या बातमीतील व्हिडिओ.

बातमीतील व्हिडिओ तुम्ही पहाल तर, तुम्हाला हसू रोखणे कठीण होईल. व्हिडिओमध्ये काही तरूण एका वरातीत नाचताना दिसतात. ही वरातही साधीसुधी नव्हे तर, चक्क अस्सल देशी आहे. व्हिडिओत मजेशीर असे की, काही तरूण एकत्र आलेले आहेत. त्यांनी मिळून एका तरूणाला म्हशीच्या पाठीवर बसवले आहे. आता म्हशीच्या पाठीवरून जर कोणी वरात काढली तर काय होईल? हे जाणून घेण्यासाटी तुम्ही हा व्हिडिओ पाहाच..(व्हिडिओ पाहण्यासाठी खालील व्हिडिओवर क्लिक करा)