Trending Video Of Bride: लग्न (Marriage) म्हणजे सर्वांच्या आयुष्यातील खास क्षण असतो. आपलं लग्न धुमधडाक्यात व्हावं, अशी सर्वांची इच्छा असते. लग्नसोहळा म्हणजे खुप धावपळ. सर्वांसाठी एकजुटीने पार पाडण्याचा हा कार्यक्रम असतो. वऱ्हाड्यांपासून ते कार्यवाहकांसाठी हा मोठा टास्क. तर नवरा नवरीसाठी सुद्धा सर्व पुजाविधी (Wedding Rituals) करता करता थकून जातात. अशातच एका नव्या नवरीचा व्हिडिओ (Viral Video) सध्या तुफान व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये नवरी डुलक्या घेत असल्याचं दिसतंय. (Funny viral Video of Dulhan Bride falls asleep in the mandap during wedding rituals trending on internet)
सोशल मीडियावर (Social Media) अनेक मजेशीर व्हिडिओ व्हायरल होत असतात. लग्नसोहळ्याचे व्हिडिओ नेटकरी आवर्जुन पाहतात. अशातच लग्नाच्या मंडपातील एक व्हिडिओ तुफान व्हायरल (Trending Video) होताना दिसत आहे. ज्यामध्ये लग्नाची विधी सुरू असल्याचं दिसतंय. व्हिडिओवरून ही प्रथा परंपरा साऊथ इंडियन पद्धतीने सुरू असल्याचं दिसतंय. नवरीने हातात चुडा भरल्याचं दिसतंय. तर लाल रंगाची मखमली साडी (Dulhan Bride Sarree) देखील तिने घातली आहे.
गळ्यात लग्नाचा हार घातल्याने नवरी अवघडलेल्या परिस्थितीत दिसते. लग्न झाल्यानंतर विधी सुरू असताना नवरीला झोप लागते. त्यावेळी ती एका हातावर मान टेकवून आराम करण्याचा प्रयत्न करते. त्यावेळी तिला कधी डुलकी लागते (Bride falls asleep in the mandap) कळलं देखील नाही. त्यावेळी मंडपात उपस्थित काही लोकांना नवरी झोपल्याचं समजतं. त्यावेळी...
बाजूला बसलेल्या नवऱ्याने तिला उठवलं. त्यावेळी ती खडबडून जागी झाली. समोर कॅमेरा सुरू असल्याचं लक्षात येताच नवरी जागी होते आणि एक सुंदर स्माईल देते. त्यावेळी मंडपातील काही लोकांना हसू आवरलं नाही. mahesh photography vizag या इन्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडिओ शेअर (Funny viral Video of Dulhan) करण्यात आला आहे. लाखो लोकांनी हा व्हिडिओ पाहिला असून अनेकांनी यावर भन्नाट कमेंट्स देखील केल्यात.
आणखी वाचा - Viral Video : पायाखालची जमीन सरकली अन् , लग्न सोहळ्यात डान्स करताना वऱ्हाडी गाडले गेले
दरम्यान, लग्नाची तयारी करणं हे एका दिवसाचं काम नसतं. अनेक दिवस याची तयारी सुरू असते. त्यामुळे सर्वांनाच थकवा जाणवतो. सध्या लग्नाचे अनेक मुहुर्त दिसून येत आहेत. त्यामुळे लग्न कार्यात नवरा नवरीच्या तब्येतीची काळजी घेणं देखील गरजेचं आहे.