नवी दिल्ली: आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दुरावल्यावर क्रिकेटपटू गौतम गंभीरला राजकारणाचे मैदान खुणावत असून, राजकारणाच्या मैदानात आपली नवी इनिंग सुरू करण्यासाठी गंभीर भाजपमार्गे ओपनींग करणार असल्याचे वृत्त आहे. तर, दुसऱ्या बाजूला आयारामांना आणि सेलिब्रेटी तसेच, चर्चित चेहऱ्यांना पक्षाचे फाटक नेहमीच उघडे ठेवणारा भाजप गौतम गंभीला दिल्लीतून विधानसभेचे तिकीट देण्यासाठी इच्छुक असल्याचेह समजते.
दैनिक जागरण या वृत्तसुमहाने दिलेल्या बातमीनुसार, गौतम गंभीर भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्याची शक्यता आहे. राजधानी दिल्लीतील राजकीय वर्तुळात सुरू असलेल्या चर्चेनुसार, राजधानी दिल्लीत भाजपला नव्या चेहऱ्याची आवश्यकता होती. त्यातच सामाजिक क्षेत्रात गौतम गंभीरचे सुरू असेले काम पाहता दिल्ली भाजपातील मरगळ झटकण्यासाठी कामी येईल. त्यामुळे गौतमचा पक्षप्रवेश झाला तर, त्याचा 'गंभीर' फायदा भाजपला होईल, असा पक्षातील काहींचा व्होरा आहे.
गौतम गंभीरने आपल्या आंतराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीतील शेवटचं प्रतिनिधीत्व २०१६मध्ये केले. तर, २०१२ नंतर गौतम गंभीरने एकही मर्यादित षटकांचा सामना खेळला नाही. त्यामुळे क्रिकेटपासून तो काहीसा दूरावल्याची चर्चा सुरू असतानाच, तो राजकारणात भाजपमार्गे प्रवेश करण्याचे वृत्त आले आहे. त्यामुळे त्याच्या नव्या इनिंगबद्धल पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. असे असले तरी, गौतम गंभीरने स्वत:मात्र त्याबातब कोणतीच प्रतिक्रिया अद्यापतरी दिली नाही. त्यामुळे येत्या काळात ही चर्चा कोणत्या प्रकारचे 'गंभीर'वळण घेते याबाबत उत्सुकता आहे.
२०१६ साली कसोटी सामन्यात गौतम गंभीरने शेवटचं भारताचं प्रतिनिधीत्व केलं आहे. २०१२ नंतर गौतम गंभीर भारताकडून एकही मर्यादीत षटकांचा सामना खेळलेला नाहीये. भाजप प्रवेशाच्या बातमीवर गौतम गंभीरने आपली अधिकृत प्रतिक्रीया अजुन दिलेली नाहीये. त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये या विषयात नेमक्या काय घडामोडी घडतायत हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.