जानेवारी ते डिसेंबर... तुम्हाला माहिती आहे महिन्यांना इंग्रजी नावं कशी पडली?

नव्या वर्षाची सुरुवात झाली की सर्वात आधी आपण कॅलेंडर विकत घेतो. कोणत्या महिन्यात कोणता सण आहे, वाढिदवसाला कोणता वार येतोय, सुट्ट्या कधी आहेत, दिवाळी दसरा कधी आहे हे तपासतो. कॅलेंडरचं प्रत्येकाच्या आयुष्यात महत्त्वाचं स्थान आहे. पण तुम्ही कधी विचार केला आहे का कॅलेंडरमधल्या या महिन्यांना इंग्रजी नावं कशी पडली?

राजीव कासले | Updated: Oct 14, 2023, 09:55 PM IST
जानेवारी ते डिसेंबर... तुम्हाला माहिती आहे महिन्यांना इंग्रजी नावं कशी पडली?

General Knowledge : तुम्ही कधी विचार केला आहे कॅलेंडर (Callender) नसतं तर आपलं आयुष्य कसं असतं. कोणता महिना, कोणता दिवस सुरु आहे याची आपल्याला काहीच कल्पना आली नसती. त्यामुळे महिन्यांचं आपल्या आयुष्यात खूप महत्व आहे. पण हे वर्षानुवर्षापासून वापरलं जाणारं कॅलेंडर कसं तयार झालं असेल? माणसाला हे तयार करण्यासाठी किती प्रयास पडले असतील? कॅलेंडरमधील महिन्यांना इंग्रजी नावं (English Name) कशी पडली असतील याबात तुम्हाला माहित आहे का? आज आपण त्याची माहिती करून घेऊ.

Add Zee News as a Preferred Source

कशी पडली महिन्यांची इंग्रजी नावं?
'जॅनरियुस" या लॅटीन भाषेतील शब्दापासून जानेवारी हा शब्द तयार झाला. 'जॅनरियुस' हे नाव 'जेन' या रोमन देवतेच्या आधारे ठेवण्यात आलं होतं. या देवतेला पुढे आणि पाठिमागे अशी दोन तोंड होती अशी आख्यायिका आहे. एकाचवेळी हा देव मागे आणि पुढे पाहू शकत होता, जानेवारी महिन्याचंह असंच आहे डिसेंबर महिन्याला निरोप देत नव्या महिन्याचं स्वागत केलं जातं.

फेब्रुवारी महिन्याचं नाव लॅटन 'फॅबीएरियुस' चा अपभ्रंष आहे. 'फेबू' आणि 'अरी' या शब्दांचा अर्थ शुद्धीचा देवता. हा महिना प्राचीन रोमन संस्‍कृतीमध्ये आत्मशुद्धी आणि प्रायश्चित करण्यासाठी मह्त्वाचा मानला जात असल्यामुळे त्याला फेब्रुवारी असे नाव देण्यात आलं.

मार्च महिन्याचं नाव रोमन देवता 'मार्स' या नावावरुन ठेवण्यात आलं. रोमन वर्षाची सुरुवात मार्च महिन्याने होते. मार्स हा युद्ध आणि समृद्धीचा देव मानला जातो. या दिवशी दिवस आणि रात्र समान वेळेचे असतात.

एप्रिल महिन्याचं नाव लॅटिन शब्द 'ऐपेरायर' पासून बनलं आहे. युरोपात या महिन्यात वसंताचं आगमन होत, यामुळे या महिन्याचं नाव एप्रिलियस असं ठेवण्यात आलं, पुढे याचा अपभ्रंश होऊन 'एप्रिल' असं नाव पडलं

रोमन देवता "मरकरी'च्या नावावरुन मे महिन्याचं नाव ठेवण्यात आलं आहे. वसंतदेवी 'मेयस'च्या नावावरून हे नाव पडले, अशी अख्यायिका आहे.

रोमची सर्वात मोठी देवता जीयसच्या पत्नीचं नाव जूनो असं होतं. 'जुबेनियस' या शब्दापासून 'जूनो' शब्द तयार झाला. त्याचा अर्थ 'विवाह योग्य कन्या' असा होतो. यावरुन जून नाव पडलं.

जुलै महिन्याचे नाव रोमन सम्राट जूलियस सीजर याच्या नावावरून पडले. जूलियस सीजरचा याच महिन्यात जन्म आणि मृत्यू झाला होता. 

ऑगस्ट या महिन्याचे नाव जूलियस सीजरचा पुतण्या आगस्टस सीजरच्या नावावरुन ठेवण्यात आलं.  ऑगस्ट महिन्याचं आधीचं नाव 'सॅबिस्टलिस' असं होतं.

सप्टेंबर महिन्याचं नाव लॅटिन शब्द 'सेप्टेम'वरुन ठेवण्यात आलं आहे. रोममध्ये सप्टाम या शब्दाचा अर्थ सात असा होतो, प्राचीन रोमन कॅलेंडरमध्ये सप्टेंबर महिन्याचं सातवं स्थान होतं, आता हा कॅलेंडरमधला नववा महिना आहे. 

ऑक्टोबर महिन्याचं नाव लॅटिन 'आक्टो' या शब्दापासून घएणअयात आलं आहे. प्राचीन रोमन कॅलेंडरमध्ये आठवं स्‍थान होतं. कॅलेंडरमध्ये आता हा दहावा महिना आहे. 

नवम या लॅटिन शब्दापासून नोव्हेंबर महिन्याचं नाव पडलं. नवम याचा अर्थ नऊ असा होतो. 

वर्षातील शेवटचा महिना डिसेंबरचं नाव लॅटिन शब्द 'डेसम' शब्दापासून घेण्यात आला.

About the Author