विहीर नेहमी गोलाकारच का असते? कधी विचार केलाय? जाणून घ्या शास्त्रीय कारण!

Why Well is Round in Shape: विहीरीबद्दल आपल्यापैंकी अनेकांना कुतूहल असेलच परंतु तुम्हाला माहितीये का की विहीर (Well Round Shape) ही नेहमी गोलाकारच का असते? चला तर मग जाणून घेऊया यामागील रंजक आणि शास्त्रीय कारण! विहीर शतकानुशतके (Scientific Fact) टिकून राहण्यामागे मोठं शास्त्रीय कारण आहे. 

Updated: Mar 10, 2023, 07:47 PM IST
विहीर नेहमी गोलाकारच का असते? कधी विचार केलाय? जाणून घ्या शास्त्रीय कारण! title=
General Knowledge why wells are always round in shape do you the scienfic fact behind this read the full article

Why Well is Round in Shape: विहीर... हा शब्द जरी काढला तरी आपल्यासमोर अनेक आठवणी तरळतील, नाही का? आपण लहानपणी विहीरींमध्ये (Well) पोहायला गेलो असू. विहीरच्या अवतीभवती भूत असतात याबद्दलही आपण अनेक ऐकलं असेलच. वास्तविक कथा असो नाहीतर काल्पनिक विहीरीशी संबंधी अनेक आठवणी आपल्या आहेतच. परंतु तुम्ही कधी हा विचार केलाय का की, विहीर ही गोलच (Well in Round Shape) का असते? आपण कायमच विहीर ही गोल आकारात पाहिली आहे. विहीर ही संकल्पना काही नवीन नाही, ती अत्यंत जुनी आहे. शेकडो वर्षांचा इतिहास (Well Structure in History) असणाऱ्या या विहीरीची रचना मात्र गोलकारच पाहिली आहे. यामागे एक शास्त्रीय कारणं आहे. तेव्हा जाणून घेऊया की नक्की विहीर की गोलाकारच का असते. (General Knowledge why wells are always round in shape do you the scienfic fact behind this read the full article)

तुमच्या आजोळी तुम्ही विहीर आणि त्याबाजूला असलेलं मोठं अंगण पाहिलं असेलच. विहीर (Ancident Artitechture) ही दगडांनी बांधलेली असते. विहीरीचा एक भाग हा खाली खोल असतो तर दुसरा भाग हा वर दिसतो आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे विहीर ही गोलाकार असते. असं म्हणतात की विहीरचे आयुष्य ती गोलकार असल्याने वाढते परंतु यामागे एक शास्त्रीय कारण (Scientific Reason) आहे, हे वाचून तुम्हालाही आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही. 

विहीरचे महत्त्व काय?

पाण्याची भौतिकशास्त्रानुसार, पाणी हे द्रव पदार्थ (Physics) आहे. त्यामुळे पाणी हे कुठल्याही आकारात राहू शकतं. त्यातून पाणी ज्या आकाराच्या वस्तूत ठेवतो मग ती मोठी असो वा लहान, पाणी त्या वस्तूचा आकार धारण करते. फक्त पाण्याला वजन असते. परंतु विहीर ही जमीनपासून असते त्यामुळे विहीरचा आकार आपण हवा तसा करू शकतो पण कारण हे काही की विहीर षटकोनी, चौकीनी, आयताकृती अशा आकारांपेक्षा गोलकारच ठेवली जाते. 

जाणून घेऊया शास्त्रीय कारण काय?

प्राचीन काळापासून आपण विहीर पाहतो आहोत. त्यामुळे आपल्यालाही असा प्रश्न पडतो की विहीर गोलाकारच का असते? पण तुमच्या प्रश्नातच त्याचे उत्तर आहे. तु्म्हाला हे माहितीये का की मुळात आपण आज ज्या विहीरी पाहतो आहोत त्यातेच त्याचे उत्तर आहे. मुळात विहीरी या जास्त काळा टिकाव्या म्हणूनच विहीर गोलाकार स्वरूपात असते. याला मुख्य कारण असं आहे की जर विहीर ही चौकोनी किंवा षटकोनी आकाराची असती तर त्याच्या टोकांना पाण्याचा दबाव जास्त राहिला असता आणि विहीरी टिकल्या नसत्या. गोलाकार आकारात टोकं (Well Life) तर नसतातच त्यामुळे येथे पाण्याच दबाव पडतं नाही. तेव्हा विहीरी शतकानूशतके टिकून राहतात.