याला थांबवा रेsss... नानवर थुंकी लावणाऱ्या माणसाला पाहून नेटकऱ्यांना किळस

 ढाब्यावरचा व्हिडीओ तुफान व्हायरल 

Updated: Oct 17, 2021, 01:07 PM IST
याला थांबवा रेsss... नानवर थुंकी लावणाऱ्या माणसाला पाहून नेटकऱ्यांना किळस

मुंबई : ढाब्यावरच जेवण प्रत्येकालाच आवडतं. तिथल्या जेवणावर प्रत्येकालाच ताव मारायचा असतो. पण ढाब्यावर तयार होणार जेवणं नेमकं कसं असतं यावर काहींच्या मनात शंका असते. उत्तर प्रदेशच्या गाझियाबादमधून एक व्हिडिओ समोर आला आहे.  ज्यात एक माणूस थुंकून रोटी आणि नान बनवत आहे. त्या व्यक्तीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. व्हायरल व्हिडिओ गाझियाबादच्या सिहानीगेट परिसरातील चिकन कॉर्नरचा असल्याचे सांगितले जात आहे.

व्हिडिओ समोर आल्यानंतर प्रशासन कारवाईला लागले. एखाद्या व्यक्तीने थुंकून अन्न शिजवल्याचा व्हिडिओ पाहिल्यानंतर लोक संतापले आहेत. या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून पोलिसही अॅक्शन मोडमध्ये आले. मीडिया रिपोर्टनुसार, पोलिसांनी आरोपीला अटकही केली आहे.

काय आहे या व्हिडीओत 

व्हायरल व्हिडीओमध्ये तो माणूस तंदूरी रोटी बनवताना दिसत आहे. रोटी बनवताना तो पीठापासून बनवलेल्या कच्च्या रोटीवर थुंकतो आणि मग ते शिजवण्यासाठी भट्टीत ठेवतो. आणखी बरेच लोक रेस्टॉरंटमध्ये उभे दिसतात. पण कोणाचेही लक्ष या व्यक्तीकडे जात नाही. रेस्टॉरंटच्या बाहेरून कोणीतरी हा व्हिडिओ बनवला आहे, जो व्हायरल होत आहे.

रेस्टॉरंटच्या विरोधात झाली तक्रार

मीडिया रिपोर्टनुसार, संपूर्ण प्रकरण गाझियाबाद पोलीस स्टेशनच्या सिहानीगेट परिसरातील राकेश मार्गावर असलेल्या चिकन पॉईंटचे असल्याचे सांगितले जात आहे. हा व्हिडिओ दोन दिवस जुना असल्याचे सांगितले जात आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर लोकांनी गोंधळ घातला आणि चिकन पॉईंटवर कारवाईची मागणी करत निदर्शने केली. त्यानंतर पोलीस कारवाई करायला आले. रोटी बनवणाऱ्या तमिझुद्दीन नावाच्या व्यक्तीला अटक केली आणि त्याला तुरुंगात पाठवले आणि चिकन पॉईंट विरोधात अहवालही दाखल करण्यात आला आहे.