लाकडी खोक्यात गंगा नदीत तरंगत आली 21 दिवसाची जिंवत मुलगी, नाव ठेवलं गंगा, योगी सरकार म्हणाले....

आपल्या चुका लपविण्यासाठी अमानुष लोक नवजात बालकांना झुडुपे, नद्या आणि नाल्यांमध्ये टाकतात. 

Updated: Jun 16, 2021, 10:48 PM IST
लाकडी खोक्यात गंगा नदीत तरंगत आली 21 दिवसाची जिंवत मुलगी, नाव ठेवलं गंगा, योगी सरकार म्हणाले....

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशच्या गाझीपूर जिल्ह्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला. अवघ्या 21 दिवसांच्या मुलीला  एका बॉक्समध्ये ठेवून, बॉक्स गंगा नदीमध्ये सोडण्यात आला. त्यामुळे परिसरात एकचं खळबळ माजली आहे. नदीत वाहात असलेला बॉक्स पाहाताचं नागरिकांनी तो बॉक्स बाहेर काढला, तेव्हा नागरिकांना त्या बॉस्कमध्ये एक चिमुकली हेती. एवढंच नाही तर  त्या बॉक्समध्ये सर्वत्र देवींचे फोटो आणि त्या चिमुरडीची कुंडली देखील होती. 

नदी में बहती मिली 21 दिन की नवजात 'गंगा', देवी-देवताओं की तस्वीरें और कुंडली भी थी

सदर कोतवाल विमल मिश्रा यांनी ददरी घाट गंगा किनाऱ्यावर एका बॉक्समधून लहान मुलाच्या रडण्याचा आजात ऐकला. त्यानंतर ते त्या बॉक्स जवळ गेले तेव्हा त्या बॉक्समध्ये एक मुलगी रडत होती. मिश्रा त्या चिमुरडीला घेवून बाहेर आले तेव्हा मुलीला पाहाण्यासाठी नागरिकांची एकचं गर्दी जमली. हे प्रकरण  बेकायदेशीर मुलाचं दिसत असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला.

आपल्या चुका लपविण्यासाठी अमानुष लोक नवजात बालकांना झुडुपे, नद्या आणि नाल्यांमध्ये टाकतात. या प्रकरणाचा तपास पोलीस करीत आहेत. जर पोलिसांना दोषींचा शोध लागला तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असं देखील सांगितलं आहे. 

या प्रकरणाची दखल घेत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले की, गाझीपूर जिल्ह्यातील गंगा नदीत लाकडी पेटीत नवजात बाळ मुलगी सापडली आहे. उत्तर प्रदेश सरकार मुलीची काळजी घेईल. असं देखील ते म्हणाले. तिचं नाव गंगा ठेवण्याय आलं आहे.