एकाच वेळी मुलीचे चार बॉयफ्रेंड; वडिलांनी उचललं हैराण करणारं पाऊल

मुलीचा हा प्रताप ऐकून, वडिलांचा पारा वाढला.... पण 

Updated: Mar 12, 2021, 12:18 PM IST
एकाच वेळी मुलीचे चार बॉयफ्रेंड; वडिलांनी उचललं हैराण करणारं पाऊल title=

मुंबई : मुलगी या कायमच वडिलांच्या जवळची असते. मुलीचं प्रेम आईपेक्षा सर्वाधिक आपल्या बापावर असतं. पण वयात आलेली मुलगी ही प्रत्येक वडिलांची चिंतेची बाब असते. मुलगी वयात आली की प्रत्येक वडील तिच्या सुरक्षेची काळजी जास्त करत असतात. अशीच एका चिंतेत असलेल्या वडिलांची बातमी (Girl having four boyfriend, father took this shocking decision) समोर आली आहे. 

गुजरातमधील अहमदाबादमधील एक अजब प्रकार समोर आला आहे. 20 वर्षीय तरूणीच्या एका मित्राने तिच्या वडिलांना काही फोटो, फोन रेकॉर्डिंग, चॅटचे स्क्रीन शॉर्ट दिले. या सगळ्या गोष्टीतून मुलीचे एकाचवेळी एक दोन नव्हे तब्बल चार बॉयफ्रेंड असल्याची माहिती समोर आली आहे. एवढंच नव्हे ज्या मुलाने ही माहिती दिली तो देखील त्या चार बॉयफ्रेंडपैकी एक आहे. 

मुलीचा हा सगळा प्रकार बघता वडिलांच्या पायाखालची जमिनीच सरकली. याबाबतची माहिती कुणालाही न देता ते मुलीच्या भविष्याच्या चिंतेत गर्क झाले. मुलीशी याबाबत काही बोललं तर ती टोकाचं पाऊल उचलेल आणि घर सोडून जाईल. वडिलांनी खूप विचार करून एक महत्वाचा निर्णय घेतला. 

वडिलांनी कोणाशीही संवाद न साधला थेट पोलिसांच्या काऊंसलिंग सर्विसशी संपर्क साधला. महिलांसाठी 'अभम्' नावाने पोलिसांचे काऊसिंग सर्विस असते. ज्याचा 181 असा हेल्पलाईन नंबर आहे. वडिलांनी आपल्या मुलीचा संपूर्ण प्रकार या नंबरवर सांगितला. अभम् ची संपू्र्ण टीम मुलीच्या घरी पोहोचली. सुरूवातीला तिने या सगळ्या प्रकाराला विरोध दर्शवला. त्यानंतर पोलिसांनी मुलीला सर्व रेकॉर्डिंग आणि फोटोज वडिलांच्या मार्फत दाखवले. त्यानंतर मुलीने या सगळ्यागोष्टी मान्य केल्या. 

काऊंसलिंग सर्विसच्या महिला अधिकाऱ्यांनी मुलीला अतिशय प्रेमाने समजावलं. या दरम्यान त्यांनी तिच्या एका बॉयफ्रेंडशी बोलणं देखील करून दिलं. हा मुलगा या मुलीच्या संपर्कात असूनही दुसऱ्याच मुलीशी लग्न करणार होता. यानंतर या मुलीने स्वतःहून सगळ्या गोष्टी डिलिट करण्याचा प्रयत्न केला. 

यानंतर त्यांनी मुलीच्या वडिलांचं समुपदेशन केलं. त्यांना यानंतर मुलीला कधीही याविषयावर बोलू नका. तसेच या प्रकरणाबाबत कुणाशीही वाच्यता करू नका असे सांगितले.