जा पड तिकडं! Girlfriend उतरेना मग त्याने जे केलं ते पाहून पोट धरून हसाल Video Viral

चॅलेंज लावून सांगतो व्हिडीओ पाहून तुम्ही पोट धरून हसाल

Updated: Sep 17, 2022, 09:03 PM IST
जा पड तिकडं! Girlfriend उतरेना मग त्याने जे केलं ते पाहून पोट धरून हसाल Video Viral  title=

Viral Video : सोशल मीडियावर अनेक मजेदार व्हिडीओ व्हायरल होत असतात. अशा घटना आणि विचित्र गोष्टींचे व्हिडीओही व्हायरल होत असतात, अनेक व्हिडीओ असे असतात की ते व्हिडीओ पाहून त्यावर विश्वास ठेवणं शक्य होतं. तर काही व्हिडीओ पाहता हसू आवरलं जात नाही. असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंडचा आहे.

व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये रस्त्यावर पाणी तुंबलेलं दिसत आहे. वाहने येताना जाताना दिसत आहेत. दरम्यान, एक मुलगा आणि मुलगी स्कूटीवरून जात असताना त्यांची गाडी पाण्यात अडकते. मुलगा स्कूटी चालू करत असतो मात्र तरीसुद्धा मुलगी तशीच गाडीवर बसलेली पाहायला मिळते. 

काही वेळाने मुलगा डायरेक्ट गाडीचं हँँडल सोडून देतो. त्यामुळे मुलगी गाडी वाहत असलेल्या पाण्यात पडते. गाडीवर बसलेल्या मुलीने विचारही केला नसेल की मुलगा डायरेक्ट गाडी सोडून देईल. पाण्यात पडल्यामुळे ती भिजते. हा व्हिडिओ पाहताना तुम्ही हसू आवरू शकणार नाही. 

 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

 हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर thebackbencherrs नावाच्या पेजवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत 1 लाखाहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. व्हिडिओवर लोक अनेक मजेशीर कमेंट करत आहेत.