Crime News : प्रेम आंधळं असतं असं म्हटलं जातं, प्रेमामध्ये आपल्या पार्टनरसाठी काहीही करण्याची तयारी प्रेमवीरांची असते. प्रेमासाठी घरच्यांच्यासह समाजाच्या विरोधातही जातात. मात्र ज्या प्रेमासाठी इतकं मोठं पाऊल उचलणार असतो त्याच पार्टनरने धोका दिला तर विचार करा काय भावना असतील. प्रेमात धोका झाल्यावर प्रेमवीर दुसऱ्याचं नाहीतर स्वत:चं आयुष्य संपवण्याचा विचार करतात. असच एक प्रकरण समोर आलं आहे. ज्यामध्ये एक तरूणी तिच्या बॉयफ्रेंडला धोका (Girlfriend Double Date) देते. मात्र त्यानंतर तरूणाने जे टोकाचं पाऊल उचललं ते पाहून सर्वांनाच धक्का बसला आहे. (Girlfriend Double Date Man Took Extreme Step After Betrayed by Girlfriend)
नक्की काय आहे प्रकरण?
तरूणाचं एका मुलीसोबत अफेर चालू होतं. मात्र त्याला समजतं की त्याच्या गर्लफ्रेंडचं बाहेर दुसऱ्या मुलासोबत अफेर आहे. त्यानंतर त्याला ही गोष्ट सहन होत नाही. तो आपलं जीवन संपवण्याचा निर्णय घेतो. तरूण स्वत:ला गोळी मारून स्वत: ला संपवतो. (Girlfriend Double Date Young Boy Took Extreme Step) त्याआधी तो एक 4 मिनिटाचा व्हिडीओ फेसबुकवर पोस्ट (Facebook Video) करतो.
फेसबुक व्हिडीओमध्ये काय?
प्रेमसंबंधादरम्यान तरूणीने मला शारीरिक, मानसिक आणि आर्थिक छळ करत होती. तिचे बाहेर एका मुलासोबत संबंध होते. त्या दोघांनीही मला संपवण्याचं ठरवलं होतं. त्यामुळे मी आत्महत्या करत आहे. असे आरोप तरूणाने व्हिडीओमध्ये केले आहेत.
असा झाला उलगडा
सोमवारी 12 च्या सुमारास तरूण गावातील एका पार्ट्सच्या गोदामामध्ये अंघोळीला जातो. दोन तास होऊनही तो माघारी जात नाही त्यानंतर एका तरूणाला त्याला बोलवण्यासाठी पाठवतात. मात्र तिथं गेल्यावर तरूणाने स्वत:ला संपवलेलं असतं आणि एका बाजूला बंदूक पडलेली असते.