7th Pay commission : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी गुडन्यूज, 7 दिवसांनी मिळणार मोठं गिफ्ट

7th Pay Commission : कर्मचाऱ्यांच्या खात्यात लवकरच मोठी रक्कम येऊ शकते. सूत्रांनुसार,  सरकार 28 सप्टेंबला याबाबत घोषणा करू शकते.  

Updated: Sep 20, 2022, 10:35 PM IST
7th Pay commission : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी गुडन्यूज, 7 दिवसांनी मिळणार मोठं गिफ्ट title=

7th Pay commission News: केंद्रीय कर्मचाऱ्यांना  (Central Government Employees) यंदा दिवाळीपूर्वी  (Diwali 2022) मोठी भेट मिळू शकते. केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या पगारात बंपर वाढ होऊ शकते. सप्टेंबरअखेर कर्मचाऱ्यांना वाढीव डीए (DA) मिळू शकतं. यासोबतच खात्यात 2 महिन्यांचे डीएचे पैसेही ट्रान्सफर केले जाऊ शकतात. सरकार कोणत्या दिवशी तुमच्या खात्यात पैसे ट्रान्सफर करू शकते हे आपण जाणून घेऊयात. (7th pay commission confirmed after 7 days 28 september lakhs of employees will get gift salary will increase so much in the account)

28 सप्टेंबरपर्यंत घोषणेची शक्यता

कर्मचाऱ्यांच्या खात्यात लवकरच मोठी रक्कम येऊ शकते. सूत्रांनुसार,  सरकार 28 सप्टेंबला याबाबत घोषणा करू शकते. म्हणजेच नवरात्रीमध्ये कर्मचाऱ्यांना हे गिफ्ट मिळू शकतं. कर्मचाऱ्यांना पुढील महिन्यात 38 टक्के दराने डीए मिळेल.

जुलैपासून वाढीव रक्कम मिळणार

कर्मचाऱ्यांचा नवीन महागाई भत्ता 1 जुलै 2022 पासून लागू होईल.  म्हणजेच मागील 3 महिन्यांचे पैसे थकबाकी म्हणून मिळतील. ही रक्कम वाढीव DA सोबत खात्यात ट्रान्सफर केली जाईल. कर्मचाऱ्यांचा DA अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देशांकावर (All India Consumer price Index) अवलंबून असतो. त्यानुसार कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ होते.

पगार किती वाढणार?

एखाद्या कर्मचाऱ्याचा किमान पगार 18 हजार रुपये असेल आणि कॅबिनेट सेक्रेटरी स्तरावर 56 हजार 900 रुपये असेल आणि 38 टक्के दराने डीए दिला गेला, तर मूळ वेतनावरील वार्षिक डीएमध्ये एकूण 6 हजार 840 रुपयांची वाढ होईल. म्हणजेच मासिक डीएमध्ये 720 रुपयांची वाढ होणार आहे. याशिवाय तुमचा मूळ पगार 56 हजार 900 रुपये असेल तर तुम्हाला 27 हजार 312 रुपये महागाई भत्ता मिळेल.