'पापा की परी' स्कुटीसह गटारात, Viral Video पाहून तुम्हीही पोट धरुन हसाल

Viral Video: मुली शक्यतो स्कुटी चालवण्याला पसंती देतात. पण स्कुटी चालवताना होणारे अपघातामुळे ट्रोल होतात. अपघाताचे मजेशीर व्हिडीओ पापा की परी नावाने सोशल मीडियावर पाहायला मिळतात. असे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

Updated: Dec 27, 2022, 07:24 PM IST
'पापा की परी' स्कुटीसह गटारात, Viral Video पाहून तुम्हीही पोट धरुन हसाल title=

Girls Fell Down in Gutter Viral Video: मुली शक्यतो स्कुटी चालवण्याला पसंती देतात. पण स्कुटी चालवताना होणारे अपघातामुळे ट्रोल होतात. अपघाताचे मजेशीर व्हिडीओ पापा की परी नावाने सोशल मीडियावर पाहायला मिळतात. असे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात स्कूटीसह तीन जणी गटारात पडल्याचं दिसत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. फनताप नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. काही मुली स्कूटीवर बसून जात होत्या. मात्र गाडीवरील नियंत्रण सुटल्याने स्कुटी थेट नाल्यात पडली. घटनास्थळी उपस्थित असलेल्या एका व्यक्तीने या घटनेचा व्हिडीओ आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात चित्रित केला आहे. यात तिन्ही मुली चिखलाने माखलेल्या दिसत आहेत. तर दोन व्यक्ती गटारात पडलेली स्कूटी बाहेर काढताना दिसत आहेत. इन्स्टाग्रामवर अपलोड केलेला हा व्हिडीओ आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिला आहे. 

गटरात इतका चिखल होता की, मुलींना ओळखणं देखील कठीण झालं आहे. त्यांना गटारातून बाहेर काढल्यानंतर त्यांची अवस्था पाहून तुम्हालाही हसू आल्याशिवाय राहाणार नाही. नेमकी घटना कशी घडली कोणालाही माहिती नाही. पण गाडीवर ट्रिपल सीट जात असल्याने नियंत्रण सुटलं असावा असा अंदाज बांधला जात आहे. सर्वात प्रथम सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ पाहा. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

बातमी वाचा- गारुड्याने पुंगी वाजवताच अंगात भिनभिनला नागोबा, असा वळवळत आला बाहेर; पाहा Video

व्हिडीओ पाहिल्यानंतर लोकांनी दिल्या अशा प्रतिक्रिया

funtaap या इन्स्टाग्राम अकाउंटवरून व्हिडीओ पोस्ट करताना कॅप्शनमध्ये 'अरे दीदी' असं लिहिलं आहे. या व्हिडीओ एका युजर्सने मजेशीर प्रतिक्रिया देताना लिहिलं आहे की, 'पापा की परी उडू शकली नाही.' दुसऱ्या युजर्सने लिहिलं आहे की, 'मला कळत नाही या मुलींना ड्रायव्हिंग लायसन्स कोण देतं.'  या व्यतिरिक्तही मजेशीर प्रतिक्रिया या व्हिडीओखाली देण्यात आल्या आहेत.