गोवा-विधानसभा निवडणूक : CM ममता बॅनर्जी करणार गोव्याचा दौरा

गोवा विधानसभा निवडणूक काही महिन्यावर असताना पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री 28 ऑक्टोबरला चार दिवसांच्या गोवा दौऱ्यावर येणार आहेत. 

Updated: Oct 21, 2021, 08:14 PM IST
गोवा-विधानसभा निवडणूक : CM ममता बॅनर्जी करणार गोव्याचा दौरा

पणजी : गोवा विधानसभा निवडणूक काही महिन्यावर असताना पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री 28 ऑक्टोबरला चार दिवसांच्या गोवा दौऱ्यावर येणार आहेत. तृणमूल काँग्रेस सर्व ताकदीनिशी गोव्याची विधानसभा निवडणूक लढवणार आहे. त्यामुळे ममता बॅनर्जी गोव्यात काय भूमिका घेतात आणि कोणत्या मुद्दयावर निवडणूक लढवतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागून आहे.

पश्चिम बंगाल निवडणुकीत पुन्हा सत्ता मिळवल्यानंतर ममता बॅनर्जी यांनी आता आपलं लक्ष देशाच्या राजकारणात ही घातलं आहे. भाजप विरोधात त्या प्रचार करणार आहेत. लोकसभा निव़डणुकीच्या आधी ही त्यांच्यासाठी परीक्षा असणार आहे. पश्चिम बंगाल व्यतिरिक्त इतर राज्यातील मतदार त्यांना स्वीकारणार का? या कडेही सर्वांचं लक्ष असेल.

गोव्यामध्ये भाजपचं सरकार आहे. गोव्यात पुढील वर्षी म्हणजेच 2022 मध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. गोवा विधानसभा निवडणुकीसाठी आता विविध राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. ममता बॅनर्जी यांच्या शिवाय आम आदमी पार्टीचे नेते आणि मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे देखील गोवा दौरा केला होता.