या चोराचा कॉन्फीडन्स तर पाहा, चोरी करताना पकला गेला तेव्हा असा बदलला रंग, व्हायरल व्हिडीओ

सध्या सोशल मीडियावर एका चोराने चोरी केल्याचा व्हिडीओ इंटरनेटच्या जगात व्हायरल झाला आहे.

Updated: Oct 21, 2021, 07:53 PM IST
या चोराचा कॉन्फीडन्स तर पाहा, चोरी करताना पकला गेला तेव्हा असा बदलला रंग, व्हायरल व्हिडीओ title=

मुंबई : सोशल मीडियाचे जग मजेदार व्हिडीओंने भरलेले आहे. दररोज हजारो लाखो व्हिडीओ येथे पाहिले आणि अपलोड केले जातात. त्यांपैकी काही खरोखरच खूप मजेदार असतात जे आपलं मनोरंजन करतात.म्हणून मग आपण त्यांना सारखेसारखे पाहतो, एवढेच काय तर आपण आपल्या मित्रांना देखील पाठवतो आणि या व्हिडीओंचा आनंद लूटतो. सोशल मीडियावरील काही व्हिडीओ मनोरंजक असतात, तर काही व्हिडीओ हे दुसऱ्यांसाठी उदाहरण ठरतात.

सध्या सोशल मीडियावर एका चोराने चोरी केल्याचा व्हिडीओ इंटरनेटच्या जगात व्हायरल झाला आहे. हा मजेदार व्हिडीओ आतापर्यंत शेकडो वेळा पाहिला गेला आहे आणि मोठ्या संख्येने नेटकऱ्यांनी त्याला पसंत देखील केला आहे. हा व्हिडीओ खूपच मजेदार आहे.

व्हायरल होणारा व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, एक व्यक्ती चोरीच्या उद्देशाने दुकानात घुसली आहे. तो दुकानाच्या मागच्या बाजूला गेला. त्याला वाटले की तो गर्दीपासून लांब गेला तर त्याला कोणीही पाहू शकणार नाही. आजूबाजूला कोणी नाही हे पाहता या व्यक्तीने रॅकमध्ये ठेवलेल्या वस्तूंपैकी एक बॉक्स उचलला आणि आपल्या टी-शर्टमध्ये लपवून ठेवली.

मात्र, पुढच्याक्षणी जे घडलं ते पाहून तुम्ही पोट धरुन हसू लागाल. खरं तर, जेव्हा चोराने ही वस्तु चोरली, तेव्हा त्याचे लक्ष लगेच समोर लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याकडे गेले, ज्याद्वारे त्याच्या प्रत्येक हालचालीवर स्टोअर मालकाची नजर आहे हे त्याच्या लक्षात आले.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

चोराची चोरी पकडली गेली असे त्याला कळले, तेव्हा त्याचा चेहऱ्याचा रंग उडाला. परंतु लगेच त्याने आपली शैली बदलली आणि मी काहीच केलं नाही असं दाखवत डान्स करु लागला. आणि किराणा दुकानातून बाहेर पडले. सीसीटीव्ही कॅमेरामधील हे सर्वात मजेदार आहे. जे पाहून लोकांनी यावर भरभरुन कमेंट्स केल्या आहेत. तसेच या चोराच्या वागण्याचं खोचकपणे कौतुक केलं आहे.