कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आता गोवा राज्यातही शाळा बंद

Coronavirus in Goa : कोरोनाचा पुन्हा प्रादुर्भाव वाढत आहे. दिल्ली, उत्तर प्रदेश या राज्यात शाळा, कॉलेज बंद करण्यात आली आहेत. त्यानंतर  गोव्यातही (Goa) शाळा, महाविद्यालये बंद  ठेवण्यात आली आहेत. 

Updated: Jan 4, 2022, 11:15 AM IST
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आता गोवा राज्यातही शाळा बंद title=
संग्रहित छाया

मुंबई : Coronavirus in Goa : कोरोनाचा पुन्हा प्रादुर्भाव वाढत आहे. देशात कोरोना रुग्णाची संख्या झपाटयाने वाढत आहे. त्यामुळे दिल्ली, उत्तर प्रदेश या राज्यात शाळा, कॉलेज बंद करण्यात आली आहेत. त्यानंत महाराष्ट्र राज्यात मुंबई आणि ठाणे जिल्ह्यात 1 ते 8 वीपर्यंतच्या शाळा बंद  करण्यात आल्या आहेत. आता गोव्यातही (Goa) शाळा, महाविद्यालये बंद  ठेवण्यात आली आहेत. (Goa schools and colleges closed till January 26 due to spike in Coronavirus cases)

महत्वाची बातमी, आता ठाणे जिल्ह्यातील शाळा बंद

वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर गोवा राज्य सरकारने 26 जानेवारीपर्यंत शाळा महाविद्यालय बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत (Goa Chief Minister Pramod Sawant) सोमवारी कोरोना कृती दलाची बैठक घेतली.  त्यानंतर हा निर्णय जाहीर करण्यात आला. लस घेण्यासाठी 11वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांना शाळेत यावे लागणार आहे.

कोरोना आणि ओमायक्रॉन रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे गोवा सरकारने सोमवारी शाळा आणि महाविद्यालये पुन्हा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी टास्क फोर्सची बैठक झाली. तसेच किनारपट्टीच्या राज्यातही रात्री कर्फ्यू लागू करण्यात आला. रविवारी, गोव्यात कोविड-19 पॉझिटिव्ह दर 10.7 टक्के नोंदवला गेला.

पीटीआय नुसार, टास्क फोर्सचे सदस्य शेखर साळकर यांनी पत्रकारांना सांगितले की, सोमवारपासून शाळा 26 जानेवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, इयत्ता 11 आणि 12 च्या विद्यार्थ्यांना आता त्यांचे कोविड-19 लसीकरण करण्यासाठी शाळेत जावे लागेल, त्यानंतर त्यांना 26 जानेवारीपर्यंत वर्गात जाण्याची गरज नाही.

गोव्यात रात्रीचा कर्फ्यू, इतर निर्बंध असणार आहेत. दररोज रात्री 11 ते सकाळी 6 वाजेपर्यंत नाईट कर्फ्यू लागू असेल, असे सांगण्यात येत आहे.