माणसांसारखा दोन पायांवर चालतो 'हा' बकरा?, VIDEO पाहून हसू आवरता येणार नाही

चार नाही तर दोन पायावर चालतोय हा बकरा?, VIDEO पाहून सुद्धा अनेकांना विश्वास बसत नाहीए, तुम्ही पाहिलात का? 

Updated: Aug 12, 2022, 07:53 PM IST
माणसांसारखा दोन पायांवर चालतो 'हा' बकरा?, VIDEO पाहून हसू आवरता येणार नाही  title=

मुंबई : सोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. यामधील काही व्हिडिओ असे असतात, जे पाहून तुम्हालाच तुमच्या डोळ्य़ावर विश्वास बसणार नाही. असाच एक व्हिडिओ पुन्हा व्हायरल होत आहे, हा व्हिडिओ पाहुन अनेकांना विश्वास बसत नाही. नेमकं व्हिडिओत आहे काय ते पाहूयात. 

सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये जे बकरा करतोय, ते पाहून तु्म्हाला तुमच्या डोळ्यावर विश्वास बसणार नाहीए. कारण हा बकरा दोन पायावर चालताना दिसत. बकऱ्याचा हा व्हिडिओ  सोशल मीडियावर खूप पाहिला जात आहे.

व्हिडिओत काय?
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये पशुपालन फार्मचा दिसत आहे. जिथे एक बकरा माणसांसाऱखा दोन पायांवर चालताना दिसत आहे.  हा बकरा काही पावलं चालून एका रूममध्ये घुसताना दिसतोय. चार पाय असताना देखील दोन पायावर चालतानाचा हा व्हिडिओ पाहून अनेकांना या व्हिडिओवर विश्वास बसत नाहीए. 

एका युजरने हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे. हा व्हिडिओ आतापर्यंत 4 लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. व्हिडिओला 8 हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत आणि लोक व्हिडिओवर त्यांच्या मजेदार कमेंट्स देखील करत आहेत.