सोनं आणि चांदीच्या किंमतीत घसरण, पाहा आजचे दर

सोन्याची किंमत कमी होऊन प्रति 10 ग्रॅम 32 हजार 100  रुपये 

Updated: Dec 22, 2018, 06:43 PM IST
सोनं आणि चांदीच्या किंमतीत घसरण, पाहा आजचे दर  title=

नवी दिल्ली : जगाभरात सोन्याच्या दरात झालेली घसरण आणि स्थानिक व्यापाऱ्यांची कमी मागणी या सर्वांमुळे दिल्ली सराफा बाजारात शनिवारी सोन्याची किंमतीत घट पाहायला मिळाली. सोन्याची किंमत कमी होऊन प्रति 10 ग्रॅम 32 हजार 100  रुपये झाली. नाणे निर्माते आणि औद्योगिक युनिट्सच्या कमी मागणीमुळे चांदीचा भाव 200 रुपयांनी कमी होऊन 37 हजार 800 रुपये प्रतिकिलो राहिला.

किंमत कमी 

Image result for gold silver price zee

जागतिक बाजारपेठेतील कमी मागणीमुळे तसेच स्थानिक व्यापाऱ्यांच्या सुस्त मागणीमुळे स्थानिक बाजारपेठेत सोन्याच्या किंमती कमी झाल्याचे सराफा व्यावसायिकांनी सांगितले. दिल्लीमध्ये 99.9 टक्के आणि 99 .5 टक्के शुद्ध सोन्याचा भाव अनुक्रमे 130-130 रुपयांनी कमी होऊन प्रति 10 ग्रॅमला अनुक्रमे  32,100 आणि 31, 9 50 रुपये झाले.

चांदीचा भाव 

Image result for silver price zee

 चांदीचा भाव 200 रुपयांनी कमी होऊन 37,800 रुपये प्रतिकिलोग्रॅम राहिला. साप्ताहिक डिलीव्हरी 238 रुपयांनी घसरून 37,494 रुपये प्रति किलोग्राम राहिली. दरम्यान, चांदीची विक्री किंमत 74,000 आणि 75,000 प्रति शेकडा या पुर्व स्तरावर राहिली. जागतिक पातळीवर नजर टाकली असता न्यूयॉर्कमध्ये सोने 0.33 टक्क्यांनी तर चांदीचा भाव 1.02 टक्क्यांनी घसरला.