Gold Rate Today : सोने-चांदीच्या दराबाबत मोठी बातमी, जाणून घ्या 10 ग्रॅम सोन्याचे दर

Gold Silver Price on 26th April 2023: अक्षय्य तृतीयेनंतर सोन्या-चांदीच्या दरात घसरण पाहायला मिळाली होती. मात्र आज पुन्हा सोने चांदीच्या दरात वाढ झाली आहे. ऐन लग्नसराईत सोने-चांदीच्या दरात होणारी वाढ पाहून सर्वसामान्यांची निराशा झाली आहे.

श्वेता चव्हाण | Updated: Apr 26, 2023, 11:29 AM IST
Gold Rate Today : सोने-चांदीच्या दराबाबत मोठी बातमी, जाणून घ्या 10 ग्रॅम सोन्याचे दर title=
Gold and silver rates today

Gold and Silver Price on 26 April 2023 : येत्या 1 मे पासून लग्नसराईचा हंगामा सुरू होणार आहे. लग्नसराई म्हटलं की सोने (gold rate) दागिन्यांची खरेदी आलीच.. त्यातच आता सोने-चांदीच्या (gold silver price) दराबाबत मोठी बातमी समोर येत आहे. ऐन लग्नसराईच्या दिवसात सोन्यांच्या किंमतींनी साठी गाठल्यामुळे सामान्य नागरिकांना मोठा फटका बसणार आहे. येत्या काळात सोन्याच्या किंमतीत वाढ होणार असून 71 हजारांवर सोन्याच्या किंमती जाण्याची शक्यता वर्तवण्यात येते. 

एकीकडे सोने आणि चांदीच्या (gold silver rate) दरात गेल्या अनेक महिन्यांपासून  दर वाढत चालले आहेत. मात्र दर वाढले असले तरी सोने खरेदीमध्ये फरक पडलेला नाही. कारण ग्राहकांचा सोने आणि चांदी खरेदीला तितचा प्रतिसाद असल्याचे पाहायला मिळत आहे. आज (26 एप्रिल 2023) सराफा बाजारच्या वेबसाइटनुसार 24 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमची किंमत आज 60,330 रुपये आहे. तर चांदी 74,570 रुपये प्रति किलोने विकली जात आहे. 

वाचा : तुमच्या शहरात Petrol-Diesel स्वस्त की महाग? एका क्लिकवर जाणून घ्या आजचे दर

तर मुंबईत (mumbai gold rate) 22 कॅरेट सोन्याची किंमत 55,303 रुपये प्रति 10 ग्रॅम असून 24 कॅरेट सोन्याची किंमत 60,330 प्रति 10 ग्रॅम आहे. पुण्यात प्रति 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याची किंमत 55,303 रुपये आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत 60,330 रुपये आहे. नागपुरात 22 कॅरेट सोन्याचा प्रति 10 ग्रॅमचा दर 55,303 रुपये आणि 24 कॅरेट सोन्याचा दर 60,330 रुपये आहे. तर नाशिकमध्ये 22 कॅरेट सोन्याचा दर 55,303 रुपये आणि 10 ग्रॅम, 24 कॅरेट सोन्याचा दर 60,330 रुपये आहे.

मिस्ड कॉल देऊन किंमत जाणून घ्या

22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोने दागिन्यांचा किरकोळ दर जाणून घेण्यासाठी तुम्ही 8955664433 वर मिस कॉल करू शकता. त्यानंतर लगेचच एसएमएसद्वारे दर प्राप्त होतील. 

अशा प्रकारे सोन्याची शुद्धता जाणून घ्या

आता सोन्याची शुद्धता तपासायची असेल, तर त्यासाठी सरकारने एक अॅप बनवले आहे. बीआयएस केअर अॅपद्वारे ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. या अॅपद्वारे तुम्ही केवळ सोन्याची शुद्धता तपासू शकत नाही, तर त्याच्याशी संबंधित कोणतीही तक्रारही करू शकता.