Gold Rate | उच्चांकी दरांवरून सोनं तब्बल 5000 रुपयांनी स्वस्त; जाणून घ्या आजचे दर

Gold Silver Rate today | भारतात लग्नसमारंभ तसेच सणासुदीचे दिवस सुरू आहेत. त्यामुळे सोन्याच्या दागिन्यांची मागणी वाढली आहे.

Updated: May 17, 2022, 03:48 PM IST
Gold Rate | उच्चांकी दरांवरून सोनं तब्बल 5000 रुपयांनी स्वस्त; जाणून घ्या आजचे दर title=

मुंबई : जागतिक घडामोडींमुळे जगभरातील आर्थिक व्यवहारांवर परिणाम झाला आहे. जगभरात सोने चांदीचे दर वाढले आहेत. भारतातही लग्नसमारंभ तसेच सणासुदीचे दिवस सुरू आहेत. त्यामुळे सोन्याच्या दागिन्यांची मागणी वाढली आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसात सोन्या-चांदीच्या दरांत वाढ झाली आहे.

गेल्या काही दिवसात मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सोन्याच्या दरांमध्ये वाढ झाल्याची दिसून येत आहे. आज दुपारी 3 वाजेपर्यंत सोन्याच्या वाढले होते. कालच्या उसळीनंतर आज सोने स्थिर राहिल्याचे दिसून आले आहे. MCX वर सोन्याची किंमत 50399 रुपये प्रति तोळे इतकी होती. तर चांदीची किंमत 59,935 रुपये प्रति किलो इतकी होती. 

आज मुंबईतील सोन्याच्या दरांमध्येही फारशी उलथापालथ दिसून आली नाही. काल सोन्याच्या दरांमध्ये मोठी वाढ झाली होती. आजही ते दर स्थिर राहिल्याचे दिसून आले आहे. 

मुंबईत आज 24 कॅरेट सोन्याचा दर 50,450 रुपये प्रति तोळे इतका आहे. तर चांदीचे दर 61,383 रुपये प्रति किलो इतके आहे.

सोन्याचे दर 2020 मध्ये सोने 56,000 रुपये प्रति तोळेच्या पातळीवर गेले होते.  त्यामुळे सोन्याच्या उच्चांकी पातळीवरून सोने आजही 4 ते 5 हजारांनी स्वस्त मिळत आहे.