मुंबई : जगभरातील बाजारांमध्ये चांगली तेजी दिसून येत आहे. भारतीय बाजारांमध्ये देखील गेल्या 1 महिन्यापासून तेजीचे वातावरण आहे. जागतिक अर्थव्यवस्थेत कोरोनानंतर पुन्हा सुधारणा होत असल्याने लोक इक्विटीमध्ये भरपूर पैसे गुंतवत आहेत. यामुळे सुरक्षित गुंतवणूक मानले जाणारे सोन्याच्या मागणीत घट झाली आहे.
2021 च्या सुरूवातीपासून ते आतापर्यंत सोन्यात 6 टक्के तर गेल्या वर्षभरापासून 8 टक्क्यांनी घट झाली आहे. सोने सध्या 47 हजार प्रति तोळ्याच्या आसपास ट्रेड करीत आहे. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, सोन्यात गुंतवणूक करून शॉर्टटर्मसाठी चांगले रिटर्न्स मिळू शकतात.
सर्वसाधारणपणे ऑगस्ट महिना सोन्याच्या मागणीसाठी चांगला मानला जातो. गेल्या 10 वर्षाचा चार्ट पाहिल्यावर लक्षात येते की, या महिन्यात सोन्यात सरासरी 5 ते 6 टक्के तेजी येते. परंतू ऑगस्टमध्ये सोने 2 टक्क्यांनी घसरले. कारण इक्विटी मार्केट तेजीत आहे. सोने आपल्या रेकॉर्ड उच्चांकीपासून 9 हजार रुपयांनी स्वस्त ट्रेड करीत आहे.
केडिया एडवायजरीचे डायरेक्टर अजय केडियांचे म्हणणे आहे की, डॉलरमध्ये सध्या घसरण पहायला मिळत आहे. तसेच इमर्जिंग मार्केटमध्ये सोन्याची मागणी वाढत आहे.
अनेक सेंट्रल बँका सोन्यात खरेदी करीत आहेत. आता हाय व्हॅल्युएशनमुळे बाजारात घसरणीची शक्यता आहे. या फॅक्टर्समुळे शॉर्टटर्ममध्ये सोन्याला सपोर्ट मिळेल. सोन्याने 47600 प्रति तोळ्याचा लेवल ब्रेक केल्यास तेथून 1 महिन्यासाठी 48600 रुपयांचे लक्ष ठेऊन खरेदी करता येईल. सोने पुढील काही दिवस 46700 च्या पुढे टिकून राहिले तर, 48600 च्या लेवल पर्यंत जाण्याची शक्यता आहे.