NTPC बॉंडच्या माध्यमातून 18 हजार कोटी उभारणार; शेअर होल्डर्सकडून मागितली परवानगी

सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी एनटीपीसी 28 सप्टेंबरमध्ये आपल्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीत बॉंड जीरी करण्यासाठी शेअर होल्डर्सची परवानगी मागणार आहे. 

Updated: Sep 5, 2021, 07:31 AM IST
NTPC बॉंडच्या माध्यमातून 18 हजार कोटी उभारणार; शेअर होल्डर्सकडून मागितली परवानगी

मुंबई : सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी एनटीपीसी (NTPC) 28 सप्टेंबरमध्ये आपल्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीत (AGM) बॉंड जीरी करण्यासाठी शेअर होल्डर्सची परवानगी मागणार आहे. वार्षिक बेठकीसाठी जारी नोटीसीत नमूद करण्यात आले आहे की, एनटीपीसीने आर्थिक नियोजनासाठी बॉंड जारी करून 18 हजार कोटींच्या उभारणीचा प्रस्ताव तयार केला आहे.

या शिवाय कंपनीला भांडवली खर्च आणि कामकाज कार्यरत ठेवण्यासाठीच्या खर्चासाठी पैशांची आवश्यकता असते. यासाठी कंपनीचा उधार घेण्याचा अधिकार 2 लाख कोटीवरून 2 लाख 25 हजार कोटींपर्यंत वाढवण्याची मंजूरीदेखील शेअऱ होल्डर्सला मागितली आहे.

कंपनीने म्हटले आहे की, भविष्यात भांडवली खर्चाची गरज लक्षात घेऊन, त्यासाठी पैशांची व्यवस्था केली जावी आणि नवीन व्यवसायांमध्ये पाऊल ठेवले जावे. यासाठी हे आर्थिक नियोजनाचे प्रस्ताव ठेवण्यात आले आहेत.