Gold Rate Today In Marathi: अर्थसंकल्पानंतर सोन्याच्या दरात मोठी घट झाली होती. त्यामुळं मागच्या आठवड्यात सलग सोन्याच्या दरात सतत घसरण होत होती. मात्र, आता या आठवड्यात सोन्याचे भाव वाढल्याचे चित्र आहे. काल सोमवारी आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोनं वधारलं होतं. आजही सोन्याच्या दरात किंचित वाढ झाली आहे. गुड रिटर्नच्या वेबसाइटनुसार, आज सोन्याच्या दरात 1 टक्क्याने वाढ झाली आहे. 24 कॅरेट सोन्याचा प्रतिग्रॅम भाव 6,917 रुपये इतका आहे.
सोन्याच्या दरात गेल्या वर्षात सतत वाढ होत होती. मात्र, अर्थसंकल्पात कस्टम ड्युटी कमी केल्यानंतर सोन्याचे दर घसरले होते. तब्बल वर्षभरात जितके दर कमी झाले नव्हते ते गेल्या आठवड्यात कमी झाले होतं. सोनं तब्बल पाच हजारांनी स्वस्त झालं होतं. मात्र, सोमवारी सोन्याच्या दरात जवळपास 200 रुपयांपर्यंत वाढ झाली होती. आजही सोनं 1 टक्का म्हणजेच 10 रुपयांनी वाढले आहे. त्यामुळं अजूनही नागरिकांचा दिलासा कायम आहे.
पुढच्या काही दिवसांतच गणेशोत्सवाला सुरू होणार आहे. या काळात बाप्पाच्या व गौराईच्या दागिन्यांसाठी सराफा बाजारातही लगबग सुरू होते. त्यामुळं सोन्याच्या दरात झालेल्या घसरणीमुळं नागरिकांना दिलासा मिळणार आहे. आज 24 कॅरेट सोनं प्रतितोळा 69,170 रुपये इतके आहे. तर, 22 कॅरेट सोन्याचे दर 63, 410 प्रतितोळा इतके आहेत.
ग्रॅम सोनं किंमत
10 ग्रॅम 22 कॅरेट 63, 410 रुपये
10 ग्रॅम 24 कॅरेट 69, 170 रुपये
10 ग्रॅम 18 कॅरेट 51, 890 रुपये
ग्रॅम सोनं किंमत
1 ग्रॅम 22 कॅरेट 6, 341 रुपये
1 ग्रॅम 24 कॅरेट 6, 917 रुपये
1 ग्रॅम 18 कॅरेट 5, 189 रुपये
ग्रॅम सोनं किंमत
8 ग्रॅम 22 कॅरेट 50, 728 रुपये
8 ग्रॅम 24 कॅरेट 69, 170 रुपये
8 ग्रॅम 18 कॅरेट 51, 890 रुपये
22 कॅरेट- 63, 410 रुपये
24 कॅरेट- 69, 170 रुपये
18 कॅरेट- 51, 890 रुपये