Gold Price Today in Maharashtra: ऐन लग्नसराईच्या दिवसांत सोन्याचे दर कोसळले आहेत. त्यामुळं ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. शुक्रवारीदेखील सोन्याच्या किंमतीत मोठी घट झाल्याचे दिसून येत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या दरात एका आठवड्याच मोठी घट झाल्याचे दिसून येत आहे. भारतीय वायदे बाजारात सोने 980 रुपयांनी घसरले आहे. तर, सकाळी 10 वाजण्याच्या सोन्याचे दर 72,440 रुपये इतके आहेत. तर, गुरुवारी सोन्याची किंमत 73,420 रुपये इतकी होती.
सोन्याच्या दरात या संपूर्ण आठवड्यात तीन हजारांइतकी घट झाली आहे. या आठवड्यात सोन्याचा दराने उच्चांक दर गाठत 75 हजारांपार पोहोचला होता. मात्र, आता सोने 72,440 वर पोहोचले आहे. सोन्याचे दर कोसळले असले तरी चांदीच्या दरात मात्र थोडी वाढ झाली आहे. आज चांदीच्या दरात 400 रुपयांची वाढ झाली असून आज 90,888 रुपयांवर चांदी ट्रेड करत आहेत. तर मागील सत्रात चांदीचे दर 90,437 वर व्यवहार बंद झाला होता.
आंतरराष्ट्रीय स्तरावरदेखील सोन्याच्या दरात मोठी घट झाली होती. यावर्षी आत्तापर्यंत यूएस स्पॉट गोल्डमध्ये 14 टक्क्यांने वाढले आहेत आणि 2,449.89 वर डॉलरचा दर उसळला आहे. मात्र, युएस फेडकडून व्याजदरात कपात होण्याची शक्यता यामुळं या आठवड्यात सोन्याच्या दरात सातत्याने घट होत असल्याचे समोर आले आहे. गुरुवारी स्पॉट गोल्डमध्ये 2.1 टक्क्यांची मोठी घट होऊन 2,328.61 प्रति डॉलरवर पोहोचले होते.
10 ग्रॅम 22 कॅरेट 66, 400 रुपये
10 ग्रॅम 24 कॅरेट 72, 440 रुपये
10 ग्रॅम 18 कॅरेट 54, 330 रुपये
1 ग्रॅम 22 कॅरेट 6,640 रुपये
1 ग्रॅम 24 कॅरेट 7,244 रुपये
1 ग्रॅम 18 कॅरेट 5,433 रुपये
8 ग्रॅम 22 कॅरेट 53,120 रुपये
8 ग्रॅम 24 कॅरेट 57,952 रुपये
8 ग्रॅम 18 कॅरेट 43,464 रुपये
22 कॅरेट- 66, 400 रुपये
24 कॅरेट- 72, 440 रुपये
18 कॅरेट- 54, 330 रुपये