Gold Price Today in Maharashtra: सोनं-चांदीच्या दरात आज पुन्हा एकदा वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. मागील आठवड्यात सोन्याच्या दराने मोठी उसळी मारल्याचे पाहायला मिळाले होते. मात्र, त्यानंतर सोनं दोन हजारापर्यंत स्वस्तदेखील झाले होते. मात्र, सोमवारी पुन्हा एकदा सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. भारतीय वायदे बाजारात सोन्याच्या दरात 270 रुपयांची वाढ झाली आहे. आज 24 कॅरेट 10 ग्रॅमचा दर 72,710 इतका आहे. तर, चांदीच्या दरात 1300 रुपयांपेक्षा जास्त वाढ झाली आहे.
अमेरिकन फेडरल रिझव्र्ह बँकेने व्याजदर कपातीची आशा धुळीस मिळवल्याने सोन्याची झळाळीही फिकी पडत आहे. शुक्रवारी सोन्याच्या दरात किंचित वाढ झाली होती. मात्र, गेल्या साडेपाच महिन्यात सर्वाधिक घसरण झाल्याचे पाहायला मिळत आहे. डिसेंबरनंतर पहिल्यांदाच सोन्याच्या दरात 3 टक्के घट झाली होती. गेल्या आठवड्यात कॉमेक्सवर सोनं 2,449 डॉलरवर पोहोचले होते. परंतु, आतापर्यंत सोन्याचा दरात 100 डॉलरने घसरण झाली आहे.
मे महिन्यानंतर लग्नसराईचा मोसम कधी होताना दिसतो. तसंच, त्यामुळं भारतात आता सोन्याची मागणीदेखील आता कमी होताना दिसणार आहे. याचा परिणाम सोन्याच्या दरात होणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. आज 24 कॅरेट 10 ग्रॅमसाठी सोन्याचा दर 72,710 रुपये इतका आहे. तर, 22 कॅरेट 10 ग्रॅमसाठी सोन्याचा दर 66,650 रुपये इतका आहे.
10 ग्रॅम 22 कॅरेट 66, 650 रुपये
10 ग्रॅम 24 कॅरेट 72, 710 रुपये
10 ग्रॅम 18 कॅरेट 54,530 रुपये
1 ग्रॅम 22 कॅरेट 6,665 रुपये
1 ग्रॅम 24 कॅरेट 7,271 रुपये
1 ग्रॅम 18 कॅरेट 5,453 रुपये
8 ग्रॅम 22 कॅरेट 53,320 रुपये
8 ग्रॅम 24 कॅरेट 58,168 रुपये
8 ग्रॅम 18 कॅरेट 43,624 रुपये
22 कॅरेट- 66, 650 रुपये
24 कॅरेट- 72, 710 रुपये
18 कॅरेट- 54, 530 रुपये