Gold Rate Today : दिवाळीआधी सोन्याला झळाळी, गाठला उच्चांकी आकडा

सोन्याने गाठला मोठा आकडा, आजचा दर जाणून घ्या 

Updated: Oct 21, 2021, 11:14 AM IST
Gold Rate Today : दिवाळीआधी सोन्याला झळाळी, गाठला उच्चांकी आकडा

मुंबई : गुरूवारी सोन्याचे दर वधारले आहेत. दिवाळी आधीचं सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. MCX वर डिसेंबर डिलिवरी सोन्यात 30 रुपयांनी वाढ झाली आहे. बुधवारी 10 ग्रॅम सोन्याचा दर 47499 रुपये आहे. तर आज गुरूवारी सोन्याचा दर 47529 रुपये इतका आहे. आज सकाळी 10 वाजता सोन्याचा दर 66 रुपयांनी वाढला असून 47656 रुपये आहे. 

सकाळच्या सत्रात किमान सोन्याचा दर 47521 रुपये तर कमाल 47,580 रुपये नोंदवला गेला आहे. तर दुसरीकडे डिसेंबर डिलिवरीमध्ये चांदीच्या दरात 218 रुपयांनी वाढ पाहायला मिळाली. त्यामुळे आता चांदीचा दर 65825 रुपये प्रति किलो आहे. सोन्याच्या दरात वाढ झाली असली तरीही हा दर गेल्यावर्षीच्या तुलनेत कमीच आहे. 

जवळपास 9 हजारांनी कमी झालं सोन 

आज जरी सोन्याच्या किमतीत वाढ दिसून येत असली तरी गेल्यावर्षीच्या तुलनेत सोने सुमारे 9 हजार रुपयांनी स्वस्त झाले आहे. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये सोने 56,200 रुपयांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचले होते. आता सोने प्रति 10 ग्रॅम 47,500 रुपयांच्या पातळीवर पोहोचले आहे. अशा प्रकारे, सोने त्याच्या आतापर्यंतच्या उच्च किमतीपेक्षा सुमारे 9 हजार रुपयांनी स्वस्त होत आहे. जर तुम्ही सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही खरेदीची चांगली संधी आहे.

सोन्याने दिलं एवढं रिटर्न? 

गेल्या वर्षीही सोन्याचा परतावा सुमारे 25 टक्के होता. दीर्घ मुदतीसाठी गुंतवणूक करत असाल, तर गुंतवणुकीसाठी सोने अजूनही एक अतिशय सुरक्षित आणि चांगला पर्याय आहे. सोने कायमच उत्तम परतावा देतो. 

सोन्याबाबत भविष्याचा अंदाज 

तज्ञांच्या मते, वर्षाच्या शेवटच्या महिन्यांत सोने विक्रमी पातळी गाठू शकते. अमेरिकेची आर्थिक आकडेवारी आणि वाढत्या महागाईची चिंता क्रूडच्या वाढत्या किमतींमुळे सोन्याच्या दरात वाढ होऊ शकते. या व्यतिरिक्त, सण, लग्नाचा हंगाम देखील सोन्याच्या किंमतीला धक्का देऊ शकतो. चीनमध्ये सुरू असलेल्या वीज संकटामुळे इक्विटी गुंतवणूकदारही सोन्यात गुंतवणूक करू शकतात. मात्र, अमेरिकन डॉलरच्या मजबुतीमुळे सोन्याच्या किमतीवरही दबाव राहण्याची शक्यता आहे.