Gold Price Today: सोनं खरेदी करण्याची आज सुवर्णसंधी; 24 कॅरेट सोनं आणखी स्वस्त

Gold Price Today: सोन्याच्या दरात आता मोठी घसरण पाहायला मिळत आहे. त्यातून आता सोन्याचे दरही अनेक स्थिरस्थावर (Gold Price Today Mumbai) राहताना दिसत आहेत. या आठवड्यात फक्त दोनदा किंवा तिनदाच सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. तेव्हा जाणून घेऊया आजचे सोन्याचे दर (Gold Rates) किती? 

गायत्री हसबनीस | Updated: May 2, 2023, 10:27 AM IST
Gold Price Today: सोनं खरेदी करण्याची आज सुवर्णसंधी; 24 कॅरेट सोनं आणखी स्वस्त title=
फाईल फोटो

Gold and Sliver Price Today: सोन्याच्या आणि चांदीच्या दरात आज फारसे मोठे बदल नाहीत. काल 1 मे 2023 ला सोन्याच्या दरात मोठी घट (Gold Price in May 2023) झाली होती. त्यानंतर आज सोनं फारसं वाढलेलं नाही. काल सोन्याचे दर हे 60 हजार 760 रूपये प्रति तोळा होते, आजही हेच दर सोन्याचे आहेत त्यामुळे सोन्याच्या दरात फारसे बदल नाहीत. तेव्हा आज सोनं खरेदीला घराबाहेर पडणार असाल तर त्यासाठी तुम्हाला सोनं खरेदी करण्याची उत्तम संधी आहे.

गेल्या काही महिन्यांपासून सोन्याच्या दरात लक्षणीय वाढ होत होती त्यातून आता अक्षय्य तृतीयेपासून (Akshaya Trutiya 2023 Gold Price) सोन्याच्या दरात मोठी घट होताना दिसते आहे. त्यामुळे यंदाच्या लग्नसराईच्या मौसमात ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. आज दोन दिवसांपुर्वी सोन्याचे दर हे 60 हजार 930 रूपये इतके होते. 

गुडरिटर्न्सनुसार, 24 कॅरेट सोन्याच्या दरात अक्षय्य तृतीयेपासून मोठी घट झालेली पाहायला मिळते आहे. अक्षय्य तृतीयेच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे एप्रिल 23, 2023 ला शुद्ध सोनं हे 60 हजार 790 रूपये प्रति तोळा इतके होते. या दिवशी सोन्यात 30 रूपयांची घट झाली होती. त्यानंतर सोनं हे 60 हजार 710 रूपये प्रति तोळा इतकं होतं. या घसरणीनंतर सोन्याच्या किंमतीत मोठी वाढ झाली आहे. 25 एप्रिल रोजी सोन्याचे दर वाढले होते.

हे दर 220 रूपयांनी वाढले आणि मग 110 रूपयांनी. त्यानंतर सोन्याचे दर हे पुन्हा 220 रूपयांनी घसरले आणि मग पुन्हा 110 रूपयांनी वाढले. मग कालच्या घसरणीनंतर आता सोन्याचे दर हे पुन्हा वाढले आहेत. (gold price today 24 carat and 22 carat gold price remains unchanged check the latest rates)

गेल्या महिन्याभरात काय होतं सोन्याचे दर? 

फेब्रुवारी महिन्यात सोन्याचे दर हे 60 हजार पार गेले. आणि ग्राहकांची चिंता वाढली. त्यामुळे त्यांच्यासाठी आता गेल्या महिन्याभरापासून तितकासा दिलासा नसला तरी आता मात्र सोन्याच्या दरात फारशी मोठी वाढ नाही. त्यामुळे सोनं हे 60 हजाराच्या पार असलं तरी सोनं खरेदी करण्याची उत्तम संधी ग्राहकांसाठी आहे. अक्षय्य तृतीयेलाही ग्राहकांनी चांगलीच सोन्याची खरेदी केली होती. गेल्या महिन्याभरात शुद्ध सोनं हे 60,878 रूपये प्रति तोळा आहे. तर 22 कॅरेट सोनं हे 55,805 रूपये प्रतितोळा आहे. 

आज चांदीचे दर किती?

आज चांदीच्या दरातही फारशी वाढ नाही. आज 1 ग्रॅम चांदी ही 76 रूपये आहे. 8 ग्रॅम चांदी 608 रूपये आहे. तर 10 ग्रॅम चांदी ही 760 रूपये आणि 100 ग्रॅम चांदी ही 7600 रूपये आहे. आज 1 किलो चांदीची किंमत ही 76,000 रूपये इतकी आहे.