Gold Silver Price Today : ७ हजारांपर्यंत स्वस्त झालं सोनं, आजचा दर महत्वाचा

सोन्याच्या राखीला बाजारात चांगलीच मागणी 

Updated: Aug 2, 2021, 09:38 AM IST
Gold Silver Price Today : ७ हजारांपर्यंत स्वस्त झालं सोनं, आजचा दर महत्वाचा  title=

मुंबई : Gold Silver Price Today : सोने, चांदीची खरेदी करायची असेल तर आताच सुवर्णसंधी असल्याचं तज्ज्ञांकडून सांगण्यात येत आहे. गुंतवणुकदारांसाठी देखील ही चांगली वेळ आहे. सोन्याच्या दरात पुन्हा एकदा वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सोने खरेदी करणाऱ्यांनी आताच खरेदी करावं. (Gold price today 2nd August 2021 : Gold Rs 47,380 per 10 gm, silver trending at Rs 67,900 a kg) 

जुलै महिन्याच्या शेवटी सोने-चांदीच्या दरात वाढ होताना दिसत आहे. 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याची किंमत सोमवारी वाढून 47,380 रुपयांवर गेली. गुड रिटर्न्स या वेबसाइटनुसार चांदी 67,900 रुपये प्रति किलो दराने विकली जात होती. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे संपूर्ण भारतामध्ये सोन्याचे दागिने किंमत बदलत आहे. सोनं हे गुंतवणूकीसाठी उत्तम पर्याय समजलं जातं. 

नवी दिल्लीमध्ये, सोन्याची किंमत प्रति10 ग्रॅम 47,140 रुपये आहे. मुंबईसाठी, पिवळ्या धातूचा दर 47,380 रुपयांना विकली जात आहे, तर चेन्नईमध्ये ती 45,470 रुपये आहे, असे वेबसाइटने म्हटले आहे. 24 कॅरेट सोन्याचा दर 48,380 रुपये प्रति 10 ग्रॅम होता.

सोन्याच्या राख्यांना बाजारात मागणी 

 रक्षाबंधनाच्या सणापूर्वी गुजरातच्या राजकोटमधील ज्वेलर्सनी यावर्षी शुद्ध सोन्या -चांदीच्या राखी बाजारात आणल्या आहेत. 22 कॅरेट सोन्याने सोन्याच्या राख्या बनवण्यात आल्या आहेत. असे ज्वेलर सिद्धार्थ साहोलीया यांनी सांगितले. "आम्ही चांदीमध्ये 50 हून अधिक आणि सोन्याच्या विभागात 15 डिझाईन्स देत आहोत. सोन्याच्या राख्यांचे वजन 1 ग्रॅम ते 1.5 ग्रॅम दरम्यान असते. चांदीच्या राख्यांची किंमत 150 ते 550 रुपये आहे.

राजकोट सोन्याच्या दागिन्यांचे केंद्र असल्याने इतर राज्यांतून अशा राख्यांना लक्षणीय मागणी आहे. "राजस्थान व्यतिरिक्त महाराष्ट्र आणि दिल्ली येथून सुवर्ण राख्यांची मागणी केली जात आहे. लोकांना नवीन संकल्पना आवडत आहे," असे साहोलीया म्हणाले. सोन्याच्या राख्यांची किंमत 6,000 ते 10,000 रुपयांपर्यंत आहे.