Gold Price Today, 7th October: सोनं-चांदीच्या दरात सातत्याने चढ-उतार होताना दिसत आहे. मागील आठवड्यात सोन्याने उच्चांकी दर गाठला होता. मात्र या आठवड्याच्या सुरुवातीलाच सोन्याचे दर कमी झाले आहेत. आज पुन्हा एकदा सोन्याच्या दरात सुस्ती दिसून आली आहे. सोमवारी 7 ऑक्टोबर रोजी वायदे बाजारात सोनं आणि चांदीच्या दरात घट झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातही सोनं डॉलरच्या तेजीमुळं नरमाई दिसून येत होते. डॉलरच्या मजबूतीमुळं सोनं 10 डॉलरने घट होऊन 2670 डॉलरच्या आसपास स्थिरावले आहे. तर, चांदी 32 डॉलरच्या वर स्थिरावली.
मागील आठवड्यात सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली होती. आंतरराष्ट्रीय बाजारात घडणाऱ्या घडामोडींमुळं सोन्याच्या दारात सातत्याने चढ-उतार होत होते. मात्र आज ग्राहकांना थोडा दिलासा मिळाला आहे. सध्या नवरात्र सुरू आहे. काहीच दिवसांत दसरा येणार आहे. दसऱ्याच्या दिवसांत मोठ्या प्रमाणात मौल्यवान धातुची खरेदी केली जाते. त्यामुळं सोन्याचे दर वाढत असताना ग्राहकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते.
गुडरिटर्ननुसार, आज 24 कॅरेट सोन्याचा दर 220 रुपयांनी घसरला आहे. त्यानुसार आज प्रतितोळा सोनं 77,450 रुपयांवर स्थिरावलं आहे. तर, 22 कॅरेट सोन्याचा दर 200 रुपयांनी घसरून 71,000 रुपयांवर स्थिरावलं आहे. 18 कॅरेट सोन्याचे दर 170 रुपयांनी घसरून 58 हजारांवर स्थिरावले आहे.
ग्रॅम सोनं किंमत
10 ग्रॅम 22 कॅरेट 71,000 रुपये
10 ग्रॅम 24 कॅरेट 77,450 रुपये
10 ग्रॅम 18 कॅरेट 58,090 रुपये
ग्रॅम सोनं किंमत
1 ग्रॅम 22 कॅरेट 7,100 रुपये
1 ग्रॅम 24 कॅरेट 7, 745 रुपये
1 ग्रॅम 18 कॅरेट 5, 809 रुपये
ग्रॅम सोनं किंमत
8 ग्रॅम 22 कॅरेट 56,800 रुपये
8 ग्रॅम 24 कॅरेट 61,960 रुपये
8 ग्रॅम 18 कॅरेट 46,472 रुपये
22 कॅरेट- 71,000 रुपये
24 कॅरेट- 77,450 रुपये
18 कॅरेट- 58,090 रुपये