मुंबई : सोन्याच्या दरात गेल्या काही दिवसांपासून चढ-उतार पाहायला मिळत आहे. ऑक्टोबरच्या सुरूवातीलाच सोने आणि चांदीच्या दरात खूप बदल झाले. गेल्या आठवड्यात काही सत्रांमध्ये डॉलर निर्देशांक मजबूत झाल्यामुळे सोन्यामध्ये घसरण सुरू झाली.
गुरुवार आणि शुक्रवारीही सोन्याचे देशांतर्गत स्पॉट किमतीत घसरण झाली होती, पण सोमवार, १ नोव्हेंबर २०२१ रोजी सोन्याने किंचित वाढ नोंदवली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्याचा कल कायम आहे. दोन्ही बाजारात चांदीच्या दरात घसरण झाली आहे.
मल्टी-कमोडिटी एक्सचेंजमध्ये आज सकाळी 9.24 वाजता सोन्याचा भाव 0.07% किंवा 35 रुपयांनी वाढला आणि त्याची किंमत 47,670 रुपये प्रति 10 ग्रॅम नोंदवली गेली. मागील सत्रात तो 47,635 रुपयांवर बंद झाला होता. दुसरीकडे, चांदीचा विचार केल्यास, चांदी एमसीएक्सवर 0.16% किंवा 102 रुपयांच्या घसरणीसह 64,432 रुपये प्रति किलोवर व्यवहार करत होती. मागील सत्रात तो 64,534 रुपयांवर बंद झाला होता.
जर तुम्ही GoldPrice.org वर बघितले तर, आंतरराष्ट्रीय बाजारात भारतीय वेळेनुसार सकाळी 09.26 वाजता MCX वर सोने 0.04 टक्क्यांनी वाढले होते आणि धातू प्रति औंस $ 1784.13 वर व्यापार करत होता. त्याच वेळी चांदी 0.33 टक्क्यांनी घसरून 23.82 डॉलर प्रति औंस झाली.
गेल्या वर्षी दिवाळी 14 नोव्हेंबर 2020 रोजी होती. त्याच दिवशी सोन्याचा दर 51,000 प्रति 10 ग्रॅमच्या वर गेला होता. 9 नोव्हेंबरला त्याची किंमत 52,000 च्या वर होती आणि 30 नोव्हेंबरला त्याची किंमत जवळपास 48,100 रुपयांपर्यंत खाली आली होती. याचा अर्थ असा की मागील दिवाळीच्या तुलनेत यावेळी तुम्ही 3,100-3,400 रुपयांनी स्वस्त सोने खरेदी करू शकता.