उच्चांकी वाढीनंतर आज सोन्याच्या दरात तब्बल हजार रुपयांची घट, 1, 8 आणि 10 ग्रॅम सोन्याचा दर वाचा

Gold Price Today On 23st May 2024: सोन्याच्या दरात आज पुन्हा एकदा घसरण झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळं ग्राहकांना थोडा दिलासा मिळाला आहे.

मानसी क्षीरसागर | Updated: May 23, 2024, 11:03 AM IST
उच्चांकी वाढीनंतर आज सोन्याच्या दरात तब्बल हजार रुपयांची घट, 1, 8 आणि 10 ग्रॅम सोन्याचा दर वाचा title=
Gold Price Today gold and silver price fall check new rates in maharashtra

Gold Price Today: सोनं खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही आजच सराफा बाजार गाठा. सोने-चांदीच्या दरात आज मोठी घसरण झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दराने उसळी घेतली होती. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून सोन्याच्या दरात मोठी घट झाल्याचे समोर आले आहे. आज सोन्याच्या दरात मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे. 24 कॅरेट सोन्याच्या दरात 1,090 रुपयांची घट झाली आहे. त्यामुळं आज सोन्याचे दर 73,420 रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. 

आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याचे दर घसरल्याने देशांतर्गंत बाजारातही सोन्याचे दरात घट झाली आहे. जर या संपूर्ण आठवड्याचा विचार केला तर, सुरुवातीला सोन्याचे दर 75,000 हजारांवर पोहोचले होते. मात्र आता गेल्या दोन दिवसांत 2700 रुपयांनी खाली घरसले आहेत. तर, चांदीच्या 96,000 रुपये होते. मात्र, आता त्यातही 4700 रुपयांची घसरण झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून दोन्ही मौल्यवान धातुच्या वाढत्या किंमतीला आज ब्रेक लागला आहे. 

गुडरिटर्ननुसार, बुधवारी सोन्याचे दर फक्त 50 रुपयांनी कमी झाले होते. 74,510 रुपये असा सोन्याचा दर ट्रेड होत होता. तर, आत तब्बल एक हजारांहून अधिक घसरण झाली आहे. आज सोन्याचे दर 24 कॅरेट 10 ग्रॅमसाठी 73,420 इतके आहेत. तर एक किलो चांदीचे दर आज 92,500 वर ट्रेड करत आहेत. 

ग्रॅम              सोनं           किंमत

10 ग्रॅम     22 कॅरेट   67, 300 रुपये
10 ग्रॅम     24 कॅरेट   73, 420  रुपये
 10 ग्रॅम    18 कॅरेट   55, 070 रुपये

ग्रॅम              सोनं           किंमत

1 ग्रॅम     22 कॅरेट   6,730 रुपये
1 ग्रॅम     24 कॅरेट   7,342 रुपये
1 ग्रॅम    18 कॅरेट    5,507 रुपये

ग्रॅम              सोनं           किंमत
8 ग्रॅम     22 कॅरेट   53,840 रुपये
8 ग्रॅम     24 कॅरेट   58,736 रुपये
8 ग्रॅम    18 कॅरेट    44,056  रुपये

मुंबई - पुण्यात कसे असतील सोन्याचे दर?

22 कॅरेट-  67,300 रुपये 
24 कॅरेट- 73,420  रुपये
18 कॅरेट- 55, 070 रुपये