नवी दिल्ली : गेल्या अनेक दिवसांपासून विक्रमी नोंद असलेल्या सोने दरात मोठी घसरण झाली पण आता पुन्हा सोन्याच्या दरांत ७३० रूपयांनी वाढ झाली आहे. आज दिल्लीच्या स्थानिक बाजारात सोनं ७३० रूपये प्रति ग्रॅम तर चांदी १ हजार ५२० रूपये प्रति किलोग्रॅमने वाढली आहे. एचडीएफसी सिक्युरिटीजच्या मते सोन्याचे दर प्रति १० ग्रॅम ७३० रुपयांनी वाढून ५३ हजार ६९१ रुपयांवर पोहोचले आहेत, तर चांदी १ हजार ५२० रुपयांनी वाढून ७० हजार ५०० रुपये प्रति किलो झाली.
गेल्या आठवड्यात सोन्याचे दर ५२ हजार ९६१ रूपयांवर आले होते. त्याआधी सोन्याने प्रतितोळे ५८ हजार रूपयांपर्यंत उच्चांक गाठला होता. आंतरराष्ट्रीय कमोडिटी बाजारात घसरण झाल्याने सोने आणि चांदी दरात मोठी घसरणा झाल्याची माहिती जळगावातील सोने व्यापाऱ्यांकडून सांगण्यात आली आहे.
परंतु आता पुन्हा सोने आणि चांदीच्या दरांमध्ये वाढ झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोनं १ हजार ९५१ डॉलर आणि चांदी २६.२९ डॉलर आहे. एचडएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ कमोडिटी विश्लेषक तपन पटेल यांच्या माहितीनुसार शुक्रवारी सोन्याच्या दरात चढ-उतार कायम असणार आहे. तर पुढील काही दिवस सोन्याचे दर ५२ हजार ३०० ते ५३ हजार रूपयांपर्यंत कायम राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.