दागिने खरेदीची सुवर्णसंधी; सोने झाले स्वस्त, जाणून घ्या 18,22,24 कॅरेटचे दर

Gold Rate Today 14th June: सोन्याच्या दरात आज पुन्हा एकदा घसरण झाली आहे. आजचे ताजे दर जाणून घ्या. 

मानसी क्षीरसागर | Updated: Jun 14, 2024, 11:29 AM IST
दागिने खरेदीची सुवर्णसंधी; सोने झाले स्वस्त, जाणून घ्या 18,22,24 कॅरेटचे दर  title=
Gold price today on 14th june gold and silver trading steadily on mcx check price in maharashtra

Gold Rate Today 14th June: कमोडिटी बाजारासाठी या आठवड्यात चढ-उतार होत असल्याचे पाहायले मिळाले. शुक्रवार 14 जून रोजी भारतीय वायदे बाजारात व्यवहार स्थिर असल्याचे पाहायला मिळाले. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सोनं 270 रुपयांनी घसरुन 71,890 रुपयांवर स्थिरावले आहे. गुरुवारी सोन्याचे दर 72,160 रुपये इतके होते. तर, चांदीच्या दरातही 217 रुपयांची वाढ झाली असून 88,200 रुपये प्रति किलोवर स्थिर झाली आहे. काल चांदीचे दर 87,983 रुपये इतकी होती. 

आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या दरात सातत्याने घसरण होत आहे. अमेरिकेचीस प्राइस डेटच्या आकड्यांनंतर सोन्याच्या दरात घट झाली आहे. तज्ज्ञांच्या मते, सोन्याचे दर 1 टक्क्यांनी घटले आहेत. स्पॉट गोल्ड 2,296 डॉलर प्रति औंसवर होते. तर, युएस गोल्ड फ्युचर 1.7 टक्कांनी घसरून 2,315 डॉलर प्रति औंसवर स्थिरावले आहेत. 

सराफा बाजारातही नुकसान

अंतराराष्ट्रीय हाजारात आलेल्या कमजोरीनंतर राष्ट्रीय राजधानीच्या सराफा बाजारात गुरुवारी सोन्याचे दर 50 रुपयांनी घटले होते. मात्र, आज पुन्हा एकदा सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. तर, चांदीच्या किंमतीतदेखील 550 रुपयांनी घसरुन 90,950 रुपये प्रति किलोग्रॅम इतकी आहे. मागील सत्रात चांदी 91,500 रुपये प्रति किलोग्रॅमवर स्थिर झाली होती. 

आज 24 कॅरेट सोन्याचे दर 21,890 रुपये इतके झाले आहेत. तर, 22 कॅरेट सोन्याचे दर 10 ग्रॅम 65,900 रुपये आहेत. आज 22 कॅरेट सोन्याच्या दरात 250 रुपयांची घसरण झाली आहे. 

ग्रॅम              सोनं           किंमत
10 ग्रॅम     22 कॅरेट   65, 900 रुपये
10 ग्रॅम     24 कॅरेट   71,890 रुपये
 10 ग्रॅम    18 कॅरेट   53,920रुपये

ग्रॅम              सोनं           किंमत
1 ग्रॅम     22 कॅरेट   6,590 रुपये
1 ग्रॅम     24 कॅरेट   7,189 रुपये
1 ग्रॅम    18 कॅरेट    5392  रुपये

ग्रॅम              सोनं           किंमत
8 ग्रॅम     22 कॅरेट   52, 720 रुपये
8 ग्रॅम     24 कॅरेट   57,512 रुपये
8 ग्रॅम    18 कॅरेट    43,136  रुपये

मुंबई - पुण्यात कसे असतील सोन्याचे दर?

22 कॅरेट- 65, 900  रुपये
24 कॅरेट- 71,890 रुपये
18 कॅरेट- 53,920 रुपये