Gold Price Today, 9th October: तुम्हाला देखील नवरात्रीत सोनं खरेदी करण्याची इच्छा आहे का. तर आज तुम्हाला ही संधी मिळू शकते. आज नवरात्रीच्या सातव्या दिवशी सोन्याच्या दरात घट झाली आहे. पण आंतरराष्ट्रीय बाजारात सोनं उच्चांक गाठत असला तरी वायदे बाजार व सराफा बाजारात मात्र सोन्याची घसरण झाली आहे. बुधवारी मौल्यवान धातुचे भाव घसरले आहेत. तर, सराफा बाजारात सोनं किंचित स्वस्त झालं आहे. मात्र, दिवाळीनंतर सोनं पुन्हा एकदा वाढू शकते. त्यामुळं सोनं खरेदीची हिच योग्य संधी आहे.
सोन्याच्या दरात आज 760 रुपयांची घसरण झाली आहे. त्यामुळं आज 24 कॅरेट सोन्याचे भाव 76,690 रुपये प्रतितोळावर स्थिरावले आहेत. ईराण आणि इस्त्राइलदरम्यान पश्चिम आशियामध्ये निर्माण झालेल्या तणावामुळं सोन्याच्या दरात चढ-उतार होताना दिसत आहेत. तर, आंतरराष्ट्रीय स्तरावर चांदीचे दर कमी झाल्याने आज भारतात चांदी 94,000 रुपये प्रति किलोग्रॅमवर स्थिरावली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात मौल्यवान धातुमध्ये नरमाई दिसत असल्याने स्थानिक विक्रेत्यांमध्ये मागणी वाढली आहे. त्याचाच परिणाम म्हणून सोन्याच्या किंमतीत घट झाली आहे.
ग्रॅम सोनं किंमत
10 ग्रॅम 22 कॅरेट 70,300 रुपये
10 ग्रॅम 24 कॅरेट 76,690 रुपये
10 ग्रॅम 18 कॅरेट 57,520 रुपये
ग्रॅम सोनं किंमत
1 ग्रॅम 22 कॅरेट 7,030 रुपये
1 ग्रॅम 24 कॅरेट 7, 669 रुपये
1 ग्रॅम 18 कॅरेट 5, 752 रुपये
ग्रॅम सोनं किंमत
8 ग्रॅम 22 कॅरेट 56,240 रुपये
8 ग्रॅम 24 कॅरेट 61,352 रुपये
8 ग्रॅम 18 कॅरेट 57,520 रुपये
22 कॅरेट- 70,300 रुपये
24 कॅरेट- 76,690 रुपये
18 कॅरेट- 57,520 रुपये
मानसी क्षीरसागर झी 24 डिजीटलमध्ये सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. त्यांन मीडिया क्षेत्राचा 9 वर्षांचा अनुभव आहे. महाराष्ट्रा टाइम डिजीटल या वृत्तसंस्थेपासून कारकिर्दीची सुरुवात केली. राजकीय, मनोरंजन आणि अर्थ (infrastructure) या विषयात विशेष रुची आहे. त्याचबरोबर, बातमीमागची बातमी म्हणजेच घडामोडींचा विश्लेषणात्मक कव्हरेज करण्याची विशेष आवड. इन्फ्रास्ट्रक्चर आणि गुन्हे या बातम्यांमध्ये हातखंडा.
...Read More|
SRH
(20 ov) 216/6
|
VS |
RR
159(19 ov)
|
| Sunrisers Hyderabad beat Rajasthan Royals by 57 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
RCB
(20 ov) 240/4
|
VS |
MI
222/5(20 ov)
|
| Royal Challengers Bengaluru beat Mumbai Indians by 18 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
LSG
(20 ov) 164/8
|
VS |
GT
165/3(18.4 ov)
|
| Gujarat Titans beat Lucknow Super Giants by 7 wickets | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.