Gold Price Today : आता सोनं खरेदी कराच, 9800 रुपयांनी स्वस्त झालं सोनं

सोन्याच्या दरात मोठी घसरण 

Updated: Aug 12, 2021, 12:28 PM IST
Gold Price Today : आता सोनं खरेदी कराच, 9800 रुपयांनी स्वस्त झालं सोनं  title=

मुंबई : Gold Silver Price Rate : MCX वर सोन्याचा ऑक्टोबरमधील वायदा बाजार 400 रुपये प्रति 10 ग्रॅम दरावर बंद झालं आहे. इंट्रा डे दरम्यान सोन्याचा वायदा 46446 रुपये प्रति 10 ग्रॅमपर्यंत पोहोचला होता. तर 45925 पर्यंत खाली आला. मात्र आज यामध्ये फार कोणताच बदल झालेला नाही. (Gold Price Today: Yellow metal trade lower, experts say buy for a target of Rs 46,660)  सोन्याच्या बाजारात काहीच बदल झालेला नाही. गेल्या आठवड्यातील गुरूवारपासून आतापर्यंत सोन्याचा दर 1200 रुपयांनी घसरला आहे. बुधवारी सराफा बाजारात सोना आणि चांदीच्या दरात बदल झालेला नाही. 

या आठवड्यातील सोन्याचा दर 

दिवस सोन्याचा दर 
सोमवार  45886
मंगळवार 45962
बुधवार 46388
गुरूवार 46380

गेल्या आठवड्यातील सोन्याचा गर 

दिवस सोन्याचा दर
सोमवार 48086
मंगळवार 47864
बुधवार  47892
गुरूवार  47603
शुक्रवार 46640   

सोनं 9820 रुपयांनी स्वस्त 

गेल्या वर्षी, कोरोना संकटामुळे लोकांनी सोन्यात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली होती, ऑगस्ट 2020 मध्ये, एमसीएक्सवरील 10 ग्रॅम सोन्याची किंमत 56191 रुपयांच्या सर्वोच्च पातळीवर पोहोचली. आता MCX वर सोने ऑक्टोबर वायदा 46,380 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या पातळीवर आहे, म्हणजेच ते अजूनही सुमारे 9820 रुपयांनी स्वस्त होत आहे.

MCX वर चांदीचा दर 

एमसीएक्स चांदीचा सप्टेंबर वायदा जोरदार अस्थिरतेनंतर काल प्रति किलो 135 रुपयांच्या किरकोळ वाढीवर बंद झाला. आज चांदीच्या वायद्यांमध्येही 150 रुपयांची किंचित घसरण आहे. म्हणजेच काल ज्या पातळीवर चांदीचे वायदे बंद झाले, आज ते जवळजवळ त्याच पातळीवर आहेत.

2200 रुपये प्रति किलोहून अधिक घसरण झाली आहे. आज प्रति किलो 500 रूपयांनी वाढ झाली आहे. चांदी सप्टेंबर वायदा बाजारात 63000 रुपये आहे. गेल्या आठवड्यात मंगळवारी चांदीचा वायदा बाजार 68000 रुपये आहे. आठवड्याभरात 43000 रुपये प्रति किलोने स्वस्त झाली आहे.