नवी दिल्ली : सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी महत्वाची आणि चांगली बातमी आहे. कारण सोन्याच्या दरात पुन्हा एकदा घसरण झाली आहे.
आंतरराष्ट्रीय स्तरावर धांतुंच्या किमतीत सुरु असलेल्या चढ-उतारामुळे सोन्याच्या दरात घट झाली आहे. तर चांदीचे दर स्थिर राहीले आहेत.
आंतरराष्ट्रीय स्तरावर धांतुंच्या किमतीत सुरु असलेला चढ-उतारामुळे दिल्लीतील सराफा बाजारात सोन्याच्या दरात २५ रुपयांनी किरकोळ घट झालीय.
सोन्याच्या दरात २५ रुपयांनी घट झाल्याने सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम २९,५२५ रुपयांवर पोहोचला आहे. तर, चांदीचे दर स्थिर राहीले आहेत.
आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोनं ०.१८ टक्क्यांनी घट झाल्याने तो १२५७.५० डॉलर प्रति औन्स झाला आहे. तर, चांदीमध्येही ०.०१ टक्क्यांनी घट झाल्याने १६.०५ डॉलर प्रति औन्स झाला आहे.
यासोबतच स्थानिक बाजार आणि ज्वेलर्सकडून होणाऱ्या मागणीत घट झाल्याचं दिसत आहे. विश्लेषकांच्या मते, जगभरातील अन्य प्रमुख मुद्रांच्या तुलनेत डॉलरच्या मुल्ल्यात किरकोळ वाढ झाली.