मुंबई : Gold Silver Price: जागतिक शेअर बाजारांमध्ये मोठ्या प्रमाणात घसरण नोंदवली जात असताना, सोन्याच्या दरात काहीशी वाढ होताना दिसून आली. आज भारतीय बाजारांमध्ये सोन्याच्या दरात काहीशी वाढ झाली होती तर, चांदीच्या दरांमध्येही काहीशी वाढ झाली. जाणून घेऊया आजचे सोने-चांदीचे दर...
सोन्याचे दर 2020 मध्ये सोने 56,000 रुपये प्रति तोळेच्या पातळीवर गेले होते. लग्नसराईच्या दिवसांमध्ये सोने चांदी खरेदीकडे ग्राहकांचा कल असतो. तुम्हालाही सोने-चांदी खरेदी करायची असेल, तर आजचे दर जाणून घ्या
मल्टीकमोडिटी एक्सचेंज (MCX) वर आज सकाळी 24-कॅरेट सोन्याची फ्युचर्स किंमत 100 रुपयांनी घसरून 50734 रुपये प्रति 10 ग्रॅम झाली, जी तीन महिन्यांतील नीचांकी पातळी आहे. त्याचवेळी चांदीचा भावही 670 रुपयांनी घसरून 60,160 रुपये प्रति किलोवर बंद झाला.
मुंबईत आज 24 कॅरेट सोन्याचे दर 51,000 रुपये प्रति तोळे इतके होते. चांदीचा दर 60,400 रुपये प्रति किलो इतके होते. त्यामुळे सोन्याच्या उच्चांकी पातळीवरून सोने आजही 5 ते 6 हजारांनी स्वस्त मिळत आहे.